Fifa World Cup 2022 : आधी कचाकचा भांडले अन् मग जे घडलं ते सारेच पाहत बसले, कतार-इक्वेडोर लढतीत 'अजब' सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 06:04 PM2022-11-21T18:04:30+5:302022-11-21T18:04:37+5:30
फिफा वर्ल्डकप सुरू झाला. जगभरात या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. काल २० नोव्हेंबर रोजी कतार येथे पहिला सामना इक्वाडोर विरुद्ध कतार असा झाला. यात कतारचा ०-२ ने पराभव झाला.
फिफा वर्ल्डकप सुरू झाला. जगभरात या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. काल २० नोव्हेंबर रोजी कतार येथे पहिला सामना इक्वाडोर विरुद्ध कतार असा झाला. यात कतारचा ०-२ ने पराभव झाला. या सामन्यादरम्यानचा एख व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोन चाहत्यांमध्ये वादावादी झाल्याचे दिसत आहे.
काल झालेला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्यो मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी झाली होती. या दरम्यान, दोन्ही संघाच्या चाहत्यांची एकमेकांविरुद्ध वादावादी सुरू झाली. यावेळी दोन्हीकडून एकमेकांना आवाज चढवून बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Oh no he didn't 💀pic.twitter.com/ndJtKAjVqH
— Troll Football (@TrollFootball) November 20, 2022
यामध्ये इक्वेडोरचा चाहता स्टेडीयममध्ये उभा असताना'पैसे' घेण्याबाबत बोलत आहे, ज्यावर कतारचे चाहते संतापले. शेजारी बसलेल्या एका कतारी चाहत्याने त्या चाहत्याला खाली बसून तोंड बंद करण्यास सांगितले. त्यांचा वाद पुढे वाढत गेला.
कतारी चाहत्याने इक्वेडोरच्या चाहत्याला वारंवार 'शट अप' आणि 'सिट डाउन' असे सांगितले, वारंवार विनंती करूनही इक्वेडोरच्या चाहत्याने ते मान्य केले नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी दोघांनाही समजावून सांगून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण मॅचच्या सुरुवातीलाच आहे, त्यानंतर दोघांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांनी हस्तांदोलन केले आहे आणि आपले वााद मिटवले आहेत. करोडो लोकांनी ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
The Ecuador and Qatar fan who went viral cleared their differences at half time #FIFAWorldCuppic.twitter.com/moKUflvlNo
— FIFA World Cup 2022 (@2022_QatarWC) November 20, 2022
या सामन्यात कतारला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ‘अ’ गटाच्या लढतीत इक्वेडोरने कतारचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोरच्या विजयाचा शिलेदार कर्णधार एनर व्हॅलेन्सिया होता, त्याने दोन्ही गोल केले.