FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:31 AM2022-11-19T06:31:24+5:302022-11-19T06:31:56+5:30

FIFA World Cup 2022: जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त यजमानपदाखाली २००२ ला आशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन झाले.

Qatar with a population of 300,000 is ready for the FIFA World Cup | FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

Next

- अभिजित देशमुख
दोहा : जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त यजमानपदाखाली २००२ ला आशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन झाले. त्यानंतर कतार हा ३० लाख लोकसंख्येचा आशियातील दुसरा देश स्वबळावर इतके मोठे आयोजन करू शकेल, असा कुणी विचार केला नसावा. फिफा आयोजनाच्या इतिहासात आयोजन करणारा हा सर्वांत लहान देश ठरला आहे.

विश्वचषकाचे आयोजन ही या  देशासाठी आकर्षणाची आणि गर्वाची बाब ठरावी. वाळवंटातील हा देश मोत्यांचा शोध घेत-घेत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पाइपलाइनद्वारे गॅस पुरविणारा देश बनला. पैशाचा उपयोग जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी कसा केला जातो, हे पाहणे फारच प्रेरणास्पद आहे. आयोजनाच्या मार्गात अनेक अडथळे आलेत; पण कतार विचलित झाला नाही.

जगाचे लक्ष आता कतारकडे लागले. आपण हे आयोजन यशस्वी केल्यास जगावर  महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल याची आयोजकांना जाणीव आहे. यजमानपद मिळवण्यासाठी कतारने १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. फुटबॉल स्टेडियम, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, प्रेक्षक व्यवस्था  आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यवस्था विलक्षण दिसतात. विश्वचषक सुरू होण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना, देश फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

गर्मीचा धोका कायम...
हे आयोजन मुळात जून- जुलैमध्ये होणार होते, पण कतारमध्ये  नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या थंड महिन्यांत झाले, तरीही येथे उष्ण वातावरण कायम आहे. सकाळी दहा वाजेपासून ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरमी असते.  अतिउष्णतेमुळे खेळाडूंच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांना अधिक कठोर परिश्रम  होऊ शकतात, विश्वचषकादरम्यान ही परिस्थिती कायम राहिल्यास प्रशिक्षकांना त्यांच्या संघांच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल.

खेळ आयोजनाचा मोठा इतिहास
कतारची राजधानी दोहा येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे २००६ ला आयोजन झाले. २०१० ला अशक्य वाटणारी फिफाची बोली जिंकण्याआधी या देशाने  दोहा ओपन, एटीपी २५० आयोजित केली. २०२१ ला फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे आयोजन झाले. त्याआधी २०१९ ला  विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. पुढच्यावर्षी येथे पुरुष गटाची एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धा होईल.

Web Title: Qatar with a population of 300,000 is ready for the FIFA World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.