स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:51 AM2017-10-18T00:51:54+5:302017-10-18T00:52:09+5:30
अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले.
गुवाहाटी : अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनने तुल्यबळ फ्रान्सचा २-१ असा पराभव केला.
येथील इंदिरा गांधी अॅथलिट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फ्रान्सने आघाडी घेत स्पेनला धोक्याचा इशारा दिला. ३४व्या मिनिटाला अमिन गौइरी याने डाव्या बाजूने दिलेला पास लेन्नी पिंटोर याने अप्रतिमरीत्या घेतला आणि चेंडू थेट गोलजाळ्यात धाडून फ्रान्सला १-० असे आघाडीवर नेले. फ्रान्स मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम राखणार असे दिसत होते. परंतु, ४४व्या मिनिटाला जुआन मिरांडाने फ्रान्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत उजव्या बाजूने फेर्रान टोर्रेस याने दिलेल्या पासवर चेंडू गोलजाळ्यात धाडत सामना १-१ असा बरोबरीत आणला. (वृत्तसंस्था)
इराणने दिला मेक्सिकोला धक्का
मडगाव : सुरुवातीलाच दोन गोल करुन मिळवलेल्या भक्कम आघाडीच्या जोरावर इराणने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना मेक्सिकोचे आव्हान २-१ असे संपुष्टात आणले. पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आक्रमक सुरुवात केलेल्या इराणला मोहम्मद शरीफी याने ७व्या मिनिटाला गोल करुन आघाडीवर नेले. यानंतर चार मिनिटांनी अल्लाहयार सय्यद याने शानदार गोल करुन इराणला २-० असे भक्कम आघाडीवर नेले. विशेष म्हणजे सय्यदचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.
दोन गोलने पिछाडीवर पडलेल्या मॅक्सिकोवर कमालीचे दडपण आल्याने त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. त्यात, ३७व्या मिनीटाला रॉबर्टो डि ला रोसा
याने गोल करुन मॅक्सिकोची पिछाडी १-२ अशी कमी केली. परंतु, यानंतर इराणने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुस-या सत्रात हीच बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली होती. परंतु, फ्रान्सकडून आपल्याच गोलक्षेत्रात झालेल्या धुसमुसळ्या खेळामुळे स्पेनला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. ही सुवर्णसंधी अचूकपणे साधत रुईझने स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत नेले. पुढील फेरीत रविवारी स्पेनचा सामना इराणविरुध्द होईल.