रोनाल्डिन्होचा ‘अलविदा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:49 AM2018-01-18T03:49:50+5:302018-01-18T03:49:55+5:30
ब्राझीलच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघाचा स्टार रोनाल्डिन्हो याने फुटबॉलला अलविदा केले आहे. दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक फुटबॉलमध्ये तो अखेरचा सामना खेळला होता.
साओ पावलो : ब्राझीलच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघाचा स्टार रोनाल्डिन्हो याने फुटबॉलला अलविदा केले आहे. दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक फुटबॉलमध्ये तो अखेरचा सामना खेळला होता.
पॅरिसच्या सेंट जर्मेन आणि बार्सिलोना संघाचा माजी खेळाडू राहिलेल्या रोनाल्डिन्होने २००२च्या विश्वविजेत्या संघासाठी मोलाची भूमिका वठविली होती. २०१५ मध्ये तो फ्लूमायनेन्से संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्याचा भाऊ आणि एजंट राबर्टो एसिस याने निवृत्तीची बातमी दिली. रोनाल्डिन्हो याने पोर्तो अलेग्रे येथून करियरला सुरुवात केली होती. फ्रान्सच्या पीएसजी संघाकडून खेळताना त्याला खरी ओळख मिळाली. २००३ ते २००८ या काळात तो बार्सिलोनासाठी खेळला. २००५ मध्ये रोनाल्डिन्हो फिफाचा वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू बनला.
२००८ ते २०११ या काळात एसी मिलानसाठी खेळल्यानंतर रोनाल्डिन्हो ब्राझीलमध्ये परतला. स्थानिक फ्लेमिंगो आणि एटलेटिको मायनेइरो या संघाकडून त्याला आॅफर मिळाली होती. आंतरराष्टÑीय पातळीवर २००२ च्या विश्वचषकातील दोन गोलसह ९७ सामन्यात रोनाल्डिन्हो याने एकूण ३३ गोल केले आहेत.