FIFA Football World Cup 2018 : ... तर विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डो आणि मेस्सी प्रथमच आमनेसामने 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:23 PM2018-06-27T19:23:15+5:302018-06-27T19:40:36+5:30

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी हे जगातील दोन सर्वोत्तम खेळाडू आमनेसामने येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. अशीच एक संधी रशियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 Ronaldo and Messi are in the fray for the first time in the World Cup | FIFA Football World Cup 2018 : ... तर विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डो आणि मेस्सी प्रथमच आमनेसामने 

FIFA Football World Cup 2018 : ... तर विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डो आणि मेस्सी प्रथमच आमनेसामने 

Next

सोची -  ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी हे जगातील दोन सर्वोत्तम खेळाडू आमनेसामने येणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच... मग ती ला लीगामधील एल क्लासिको असो किंवा एखादी आंतरराष्ट्रीय सामना. त्यांचे चाहते मोठ्या संख्येने त्या लढतीला राहिलेच पाहिजेत. अशीच एक संधी रशियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण हे बाद फेरीतील निकालावर अवलंबून आहे.

पोर्तुगाल पाठोपाठ अर्जेंटिनाने विश्वचषक फुटबॅाल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश मिऴवले. पोर्तुगालने इराणला 1-1 अशा बरोबरीत रोखून, तर अर्जेंटिनाने नायजेरियाला 2-1 असे नमवून बाद फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला अ गटातील विजेत्या उरूग्वेचा सामना करावा लागणार आहे. बाद फेरीत अडखऴत प्रवेश करणा-या अर्जेंटिनाला क गटातील अव्वल फ्रांसच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. 

या सामन्यांत पोर्तुगाल आणि अर्जेंटिना यांनी आपापले सामने जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डो आणि मेसी यांना एकमेकांविरूद्ध खेऴताना पाहण्याची संधी मिऴू शकते.

विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
ख्रिस्तियानो रोनाल्डो
एकूण सामने 16 ; गोल साहाय्य 2 ; गोल 7
लिओनेल मेसी
एकूण सामने  18; गोल साहाय्य 3; गोल 6
 

Web Title:  Ronaldo and Messi are in the fray for the first time in the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.