रोनाल्डोला पाचव्यांदा ‘बेलोन डियोर’, मेस्सीची बरोबरी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:36 AM2017-12-09T03:36:24+5:302017-12-09T03:37:03+5:30
पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वषार्तील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा ह्यबेलोन डियोरह्ण हा मानाचा पुरस्कार पटकाविला
पॅरिस : पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वषार्तील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा ह्यबेलोन डियोरह्ण हा मानाचा पुरस्कार पटकाविला. त्याने एका विक्रमाची बरोबरी केली. रिअल माद्रिदच्या रोनाल्डो याने सलग दुसºया पुरस्कारासह बार्सिलोनाच्या लियोनेल मेस्सीशी बरोबरी साधली. मतदानात मेस्सी हा दुसºया तर ब्राझीलचा नेयमार हा तिसºया क्रमांकावर राहिला.
चॅम्पियन्स लीगच्या गेल्या सत्रात ३२ वर्षीय रोनाल्डो हा गोल नोंदवण्यात अव्वलस्थानी होता. त्याच्या जोरावर माद्रिदने विजेतेपद पटकाविले होते.
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला, ‘मी खूप आंनदी आहे. दरवर्षी हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी आतुर असतो. गेल्या वर्षी मिळालेल्या पुरस्कारामुळे मला यंदाही हा पुरस्कार मिळवण्याची ऊर्जा मिळाली होती. मी रेयाल माद्रिद आणि सर्व चाहत्यांचा आभारी आहे.’
दमदार रोनाल्डो... गतवर्षी झालेल्या चॅम्पियन्स लीग मोसमामध्ये रोनाल्डोने आपला दबदबा राखताना सर्वाधिक गोल करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर रेयाल माद्रिदने झुंजार युवेंट्सला निर्णायक सामन्यात धक्का देत दिमाखात आपले जेतेपद राखले होते. यानंतर रेयाल माद्रिदने रोनाल्डोच्या जोरावर ला लीगा चषकवताना पाच वर्षांनी घरच्या मैदानावर बाजी मारली.