INDvsPAK : सुनील छेत्रीने पाकिस्तानला धुतले; रोनाल्डो, मेस्सीशी बरोबरी, शेजारी भांडायला लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:37 PM2023-06-21T21:37:11+5:302023-06-21T21:39:49+5:30
भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले.
भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ( Sunil Chhetri ) हॅटट्रिक नोंदवून पाकिस्तानला एकहाती धुतले. उदांता सिंगने निर्धारीत वेळेत आणखी एक गोल करून भारताचा ४-० असा दणदणीत विजय निश्चित केला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू अन् भारतीय खेळाडूंमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.
सॅफ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात उशीराने दाखल झालेल्या पाकिस्तानकडून फार अपेक्षा नव्हतीच.. १०व्या मिनिटाला गोलरक्षकाकडून चूक झाली अन् सुनील छेत्रीने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १६व्या मिनिटांला भारताला पेनल्टी मिळाली आणि छेत्रीने गोल करून आघाडी दुप्पट केली. पाकिस्तानकडून प्रयत्न होताना दिसले, परंतु भारताचा बचाव भेदणे त्यांच्यासाठी नाकी नऊ ठरले... पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत भारतीय कोच इगोर स्टीमॅक यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला थ्रो ईन घेण्यापासून रोखले अन् खेळाडू भडकले. भारतीय खेळाडू व त्यांच्यात वाद झाल्याचे सर्वांनी पाहिले. रेफरींनी स्टीमॅक यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. पण, समोर आलेल्या व्हिडीओनुसार पाकिस्तानी खेळाडूची चूक होती.
#SAFF2023
— 👑👌🌟 (@superking1816) June 21, 2023
Some Heat Moments in the match and Red Card to the Coach of India
India vs Pakistan #INDvsPAK#INDPAK#SAFFChampionship2023pic.twitter.com/sgVavcklC4
दुसऱ्या हाफमध्ये छेत्रीने पेनल्टीवर आणखी एक गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दितील हा त्याचा ९०वा गोल ठरला आणि तो सध्या खेळत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्या मागे आहे. आतापर्यंत केवळ चार खेलाडूंना आंतरराष्ट्रीय कारकीर्दित ९०+ गोल करता आले आहेत आणि त्यामधील एक छेत्री आहे. उदांता सिंगने भरपाई वेळेत गोल करून भारताचा विजय पक्का केला.
सर्वाधिक गोल
ख्रिस्तियानो रोनाल्डो १२३
अली दाईए १०९
लिओनेल मेस्सी १०३
सुनील छेत्री ९०
Enjoy Sunil Chhetri's first goal against Pakistan.#Celebratefootball#SAFFChampionship2023#INDPAK#INDvsPAKpic.twitter.com/Qw5xL3O3XN
— T Sports (@TSports_bd) June 21, 2023
Sunil Chhetri scored the second goal from the penalty.#Celebratefootball#SAFFChampionship2023#INDPAK#INDvsPAKpic.twitter.com/CHJZVjcqYq— T Sports (@TSports_bd) June 21, 2023