व्हिएतनाममध्ये विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:36 AM2018-06-10T03:36:22+5:302018-06-10T03:36:22+5:30
विश्वचषक फुटबॉलची जादू अवघ्या विश्वाला मंत्रमुग्ध करीत आहे. व्हिएतनामदेखील याला अपवाद नाही. येथे विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री सुरू आहे.
हनोई : विश्वचषक फुटबॉलची जादू अवघ्या विश्वाला मंत्रमुग्ध करीत आहे. व्हिएतनामदेखील याला अपवाद नाही. येथे विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री सुरू आहे. पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या विश्वचषकाआधी ट्रॉफीच्या प्रतिकृतीची वाढती मागणी लक्षात घेता शहराच्या बाहेर असलेल्या कार्यशाळेतील मजुरांनी गोल्डन कलरच्या ट्रॉफी मोठ्या प्रमाणावर रंगविल्या आहेत. येथील कलावंत ही ट्रॉफी बनवून सुरुवातीला चाहत्यांना भेट द्यायचे; मात्र वाढती मागणी लक्षात घेता आता ट्रॉफीची विक्री होत आहे. मागच्या विश्वचषकात प्रतिकृती विकल्या गेल्या, पण यंदा तीनपट अधिक मागणी झाली आहे. आतापर्यंत तीन हजार ट्रॉफी विकल्याचे एका कलावंताने सांगितले. विश्वचषकाच्या खऱ्याखुºया ट्रॉफीचे डिझाईन इटलीचे शिल्पकार गाज्जानिगा यांनी तयार केले आहे. व्हिएतनाममध्ये याची प्रतिकृती ३.५ डॉलरला विकली जाते. यातून दीड लाख डॉलरचे उत्पन्न मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.