सौदी अरेबिया-इजिप्तमध्ये कांटे की टक्कर, मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 20:37 IST2018-06-25T20:37:31+5:302018-06-25T20:37:52+5:30
सलग दोन पराभवांमुळे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेल्या सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातील शेवटची साखळी लढत अटीतटीने खेळली जात आहे.

सौदी अरेबिया-इजिप्तमध्ये कांटे की टक्कर, मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी
मॉस्को - सलग दोन पराभवांमुळे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेल्या सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातील शेवटची साखळी लढत अटीतटीने खेळली जात आहे. या लढतीत दोन्ही संघांनी एकमेकांना कांटेकी टक्कर दिल्याने मध्यंतरापर्यंत ही लढत 1-1 अशा बरोबरीत आहे.
आव्हान संपुष्टात आल्यानंतर आपल्या शेवटच्या लढतीत विजय मिळवून स्पर्धेतील अभियानाची अखेर गोड करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. दरम्यान या लढतीत इजिप्तने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 22 व्या मिनिटाला मोहम्मद सलाहने गोल करून इजिप्तला आघाडी मिळवून दिली. मात्र मध्यंतराला काही अवधी असतानाच सौदी अरेबियाच्या फराजने पेनल्टी कीकवर गोल करून सौदी अरेबियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.