उद्घाटनाचा पैसा खेळावर खर्च करा! ‘फिफा’ची भारताला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:31 AM2017-09-09T00:31:21+5:302017-09-09T00:31:37+5:30

येत्या ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यावर फिफाने नाराजी व्यक्त केली .

 Spend the exposure money on the game! FIFA notice to India | उद्घाटनाचा पैसा खेळावर खर्च करा! ‘फिफा’ची भारताला सूचना

उद्घाटनाचा पैसा खेळावर खर्च करा! ‘फिफा’ची भारताला सूचना

Next

नवी दिल्ली : येत्या ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यावर फिफाने नाराजी व्यक्त केली . उद्घाटनावर होणारा खर्च खेळावर करण्याची सूचना फिफाने केंद्र सरकारला केली आहे.
भारतात होणाºया या स्पर्धेचे उद्घाटन दिमाखदार व्हावे, अशी अट क्रीडा मंत्रालयाने ठेवली आहे. उद्घाटनाचा सोहळा एक दिवसाआधी अर्थात ५ आॅक्टोबर रोजी किंवा ६ आॅक्टोबरला व्हावा, यावर मंत्रालय ठाम आहे. उद्घाटन सोहळा आयोजनाच्या सरकारच्या निर्णयावर फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा म्हणाले, ‘अशा प्रकारच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत केलेले नाही.’ यार्जा पुढे म्हणाले, ‘आमचे मुख्य लक्ष फुटबॉल आणि खेळाडूंवर असेल.’ (वृत्तसंस्था)

Web Title:  Spend the exposure money on the game! FIFA notice to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.