राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : अमरावती, अकोला, नागपूर संघाचे तिस-या दिवशीही वर्चस्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 06:27 PM2018-01-23T18:27:27+5:302018-01-23T18:27:33+5:30
महानगरपालिका व इंडिपेन्डन्ड क्लब अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने २० ते २८ जानेवारीदरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी तिस-या दिवशी अमरावती - अकोला, नागपूर संघाने गाजविला.
अमरावती : महानगरपालिका व इंडिपेन्डन्ड क्लब अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने २० ते २८ जानेवारीदरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी तिस-या दिवशी अमरावती - अकोला, नागपूर संघाने गाजविला. यामध्ये लियाकत अली संघ नवी मुबंई व रेसीडेन्सी क्लब अमरावती यांच्यात रंगलेल्या सामन्यात अमरावती संघाने १-० ने बाजी मारली.
अमरावीच्या उमेश हरणे या खेळाडूंनी २० व्या मिनिटांत गोल केला. शक्तार क्लब व ग्रीन गोंडवाना बल्लारशा यांच्यात रंगलेल्या सामन्यात अमरावती संघाचा ३-० ने विजयी ठरली यामध्ये शक्तार कल्बचे मुक्तार याने १ गोल, तर सुमित गावंडे (२) गोल करून उत्कृष्ट खेळी केली. उस्माना आझाद क्लब अकोला व गोंदिया संघात झालेल्या सामन्यात अकोला संघाने १-० ने आघाडी घेत विजश्री खेचला. या संघाच्यावतीने तवशिक खान याने सहाव्या मिनिटातला गोल करून विजेश्रीे खेचली. चेतना पुसद क्लब व हंसराज नागपूर यामध्ये खेळल्या गेलेल्या अतिशय अटीतटीचा ठरलेल्या सामन्यात हंसराज क्लब नागपुरने १-० ने विजय मिळविला. अटीतटीच्या सामन्यात नागपूरच्या कृणालने सेकंड हापमध्ये ८५ मिनिटांत गोल केला.
चैतन्य क्लब दारव्हा व सोलापूर सिटी यांच्यात सामना रंगला. यावेळी नगरसेवक विलास इंगोले, चंद्रकांत महाजन, राजेंद्र बाहेणकर, बाळासाहेब सोलीव, ज्ञानप्रकाश खोब्रागडे यांची उपस्थिी होती.
मुबंई, ठाणे, पुणे, सांगली, औरंगाबाद, भुसावळ, बुलडाणा, अकोला, नागपूर, कामठी, वर्धा, गोंदिया, बल्लारशा, यवतमाळ, दारव्हा, पुसदसह ३५ संघांचा स्पर्धेत समावेश असून, यामध्ये १२ स्थानिक संघानेही सहभाग नोंदविला आहे. एकूण १२ पंच आहेत.
आज सामने
बुधवारी एसआरपीएफ महाराष्ट्र पुणे व स्पोर्ट क्लब अमरावती, सायकोन यंग बॉईज औरंगाबाद व फे्रन्डस क्लब यवतमाळ यांच्यात, तर अमरावती फुटबॉल क्लब व मुबंईमध्ये सामने रंगणार आहेत.