Super Heroine : स्पेनच्या स्टार फुटबॉलपटूच्या 95 वर्षीय पणजीची Coronaवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:17 PM2020-04-30T17:17:29+5:302020-04-30T17:18:11+5:30
सुपर हिरोईन म्हणून खेळाडूनं केलं पणजीचं स्वागत..
जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 32 लाख 35,722 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 2 लाख 28,605 इतकी झाली असून 10 लाखांपर्यंत रुग्ण बरे झाले आहेत. या मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. पण, स्पेन फुटबॉल संघाचा मध्यरक्षक चेस्क फॅब्रेगास याच्या 95 वर्षीय पणजीनं कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. फॅब्रेगासनं स्वतः ही माहीती देताना पणजीला कडक सॅल्यूट ठोकला आहे.
फॅब्रेगासनं यावेळी डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानले. त्यांनी दिवसरात्र सेवा करून पणजीला बरे केले. ''95व्या वर्षी तिनं कोरोनावर मात केली. तिचा वैद्यकिय अहवाल नेगेटिव्ह आला आहे,'' असे फॅब्रेगासने सांगितले.
त्यानं लिहीलं की,''माझी पणजी सुपर हिरोईन झाली आहे, परंतु हे सर्व तिला ठणठणीत करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांच्यामुळे शक्य झाले. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांच्यामुळे आज हा आनंदाचा दिवस आम्ही पाहू शकलो.''
Ha superado el coronavirus con 95 años. ¡Ayer el test salió negativo! Mi bisabuela es una superherína, pero nada de esto sería posible sin la ayuda de todxs lxs enfermerxs y doctorxs que se están dejando la vida en cada instante para que todos/as podamos estar mejor y pic.twitter.com/vjoZMOhd3X
— Cesc Fàbregas Soler (@cesc4official) April 29, 2020
फ्रेंच लीग 1 मध्ये फॅब्रेगास मोनॅको संघाचे प्रतिनिधित्व करतो. स्पेनचे पंतप्रधान इडूयार्ड फिलीप यांनी इतक्यात देशात कोणत्याही स्पर्धा होणं शक्य नसल्याचे सांगितले.
फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम!
रोहित शर्माला बनायचं होतं गोलंदाज; आज जग त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं
रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज
त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली
रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video
प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची; Ajinkya Rahane बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार
Andre Russell ट्वेंटी-20 फ्रँचायझी मालकावर भडकला; केले गंभीर आरोप
Video : दाक्षिणात्य स्टार Allu Arjunनं मानले ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerचे आभार