असंख्य गरीब व होतकरू मुलांना घडविणारे फुटबॉल कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:47 PM2023-01-17T18:47:09+5:302023-01-17T18:47:29+5:30

फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले

Surendra Karkera, a football activist who raised countless poor and promising children, passed away, he orgnised Bipin Football Tournament | असंख्य गरीब व होतकरू मुलांना घडविणारे फुटबॉल कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे निधन

असंख्य गरीब व होतकरू मुलांना घडविणारे फुटबॉल कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे निधन

googlenewsNext

मुंबई : असंख्य गरीब आणि होतकरू खेळाडूंना बिपीन फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून तळमळीने फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई फुटबॉल जगताला जबर मानसिक धक्का बसला आहे.

गरीब-गरजू मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या तसेच बिपीन पुटबॉल अकादमीच्या माध्यमातून गेली ३४  वर्षे सातत्याने आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या करकेरांबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत साऱ्यांच्याच मनात आदराची भावना होती. करकेरा यांनी गेल्या चार दशकांत सामान्य फुटबॉलपटूंसाठी  आपले आयुष्य वेचले. खिशात पैसा नसतानाही ते स्वतःच्या खिशातून केवळ पैसाच काढायचे नाही तर फुटबॉलच्या दात्यांकडून, सामाजिक आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडे झोळी पसरायचे.

फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या या कार्यकर्त्याने आपल्या उभ्या आयुष्यात अनेक गरीब-गरजूंना हात पकडून फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून रात्रशाळेत त्यांना दाखल केले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून अनेकांना हॉटेल-कंपन्यांमध्ये नोकरीला लावले. यातून त्यांनी अनेक फुटबॉलपटू घडवले. फुटबॉलची सेवा केल्याबद्दल सुरेंद्र करकेरा यांचा नुकताच मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

मुलाच्या स्मरणार्थ फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन
आपला मुलगा बिपीन करकेराला रोव्हर्स कपचा सामना पहायचा होता, पण तो सामना दाखवण्याआधी त्याचे अपघातात निधन झाले. बिपीनच्या निधनाचा करकेरांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. आपण मुलाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, त्याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी बिपीन मेमोरियल फुटबॉल स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेनिमित्त ते पूर्ण मुंबई आणि आसपासच्या उपनगरात तज्ञ फुटबॉल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे केंद्र तयार करायचे आणि प्रत्येक केंद्रात खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जायचे. तसेच प्रत्येक केंद्राचा एक संघ तयार करून त्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित करायचे.  

Web Title: Surendra Karkera, a football activist who raised countless poor and promising children, passed away, he orgnised Bipin Football Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.