खेळातून सर्वांगीण विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:24+5:30

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच खेळाविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्यावे. पुढे क्रीडा व मैदानाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. याप्रसंगी अजय कंकडालवार व भास्कर तलांडे यांनी खेळ व शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

There should be overall development from the game | खेळातून सर्वांगीण विकास साधावा

खेळातून सर्वांगीण विकास साधावा

Next
ठळक मुद्देधर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन । आलापल्लीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शिक्षणासोबतच खेळ अत्यावश्यक असून खेळातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्लीच्या क्रीडा संकुलात शनिवारी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक संम्मेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार होते. विशेष अतिथी म्हणून पं.स. सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालूरकर, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अजय नैताम, पं. स. सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम, सुरेखा आलाम, शीतल दुर्गे, आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, उपसरपंच पुष्पा अलोने, लक्ष्मण येरावार, कैलास कोरेत, पराग पांढरे, सलीम शेख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच खेळाविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्यावे. पुढे क्रीडा व मैदानाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. याप्रसंगी अजय कंकडालवार व भास्कर तलांडे यांनी खेळ व शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
तत्पूर्वी धर्मरावबाबा आत्राम यांनी क्रीडाध्वज फडकवून क्रीडा व ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी महागाव, वेलगूर, आलापल्ली, इंदाराम, छल्लेवाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती नृत्य सादर केले.
शिक्षकांच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, संचालन शैलजा गोरेकर तर आभार विश्वनाथ वेलादी यांनी मानले. यशस्वीतेसाठी किशोर सुनतकर, अशोक दहागावकर, श्रावण दुर्गे, अजय सोनलवार, गणेश मेकलवार, जगदीश बोम्मावार, अमोल दुर्योधन, तेजराव दुर्गे यांनी सहकार्य केले.

Web Title: There should be overall development from the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.