त्या फुटबॉलपटूंची नऊ दिवस मृत्यूशी यशस्वी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 10:15 PM2018-07-02T22:15:39+5:302018-07-02T22:16:10+5:30
मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंनी नऊ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज सोमवारी यशस्वी ठरली. थायलंडचे नौदलाने या 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिकक्षकांना शोधण्यात यश मिळवले.
Next
त्या फुटबॉलपटूंची नऊ दिवस मृत्यूशी यशस्वी झुंज
थायलंड - मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंनी नऊ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज सोमवारी यशस्वी ठरली. थायलंडचे नौदलाने या 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिकक्षकांना शोधण्यात यश मिळवले.
Rescuers found all 12 boys and their football coach alive inside the flooded Tham Luang Cave Monday night. https://t.co/90oJCy4w8x
— The Nation Thailand (@nationnews) July 2, 2018
थायलंडमधील एका गुहेमध्ये 12 खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक अडकले आहेत. उत्तर थायलंडमध्ये असणाऱ्या या गुहेत अडकलेल्या खेळाडूंना वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. हे सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षे या वयोगटामधील आहेत. चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहात आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले. ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
या गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो असे बँकॉक पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र पावसाळ्यात याच प्रवाहामुळे गुहेत जाणे अशक्य होते. पावसाळ्याचे जून ते ऑक्टोबर हे पाच महिने या प्रवाहाला पूर आला तर पाच मीटर्स म्हणजे 16 फूट पाणी गुहेत साचू शकते असे पोलीस कर्नल कोम्सान सार्दलुआन यांनी सांगितले. या 12 जणांबरोबर त्यांचा 25 वर्षांचा प्रशिक्षकही असून त्यांनी शनिवारी दुपारी गुहेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ते गुहेतच अडकलेले होते.