आशियाई कप फुटबॉल स्पर्धा आजपासून, भारताची सलामीला गाठ थायलंडसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 02:14 AM2019-01-05T02:14:59+5:302019-01-05T02:15:08+5:30

भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे.

From today's Asian Cup football tournament, India's opening game with Thailand | आशियाई कप फुटबॉल स्पर्धा आजपासून, भारताची सलामीला गाठ थायलंडसोबत

आशियाई कप फुटबॉल स्पर्धा आजपासून, भारताची सलामीला गाठ थायलंडसोबत

Next

अबूधाबी : भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे. त्याचसोबत २०२६ च्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करणार आहे.
आशियाई फुटबॉल महासंघातर्फे (एएफसी) आयोजित या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या संघांची संख्या आता १६ वरून २४ झाली आहे. जायद स्पोर्टस् सिटी स्टेडियममध्ये यजमान संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीन यांच्यादरम्यान ‘अ’ गटातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
भारताचा याच गटात समावेश असून त्यात यजमान संघाचा समावेश आहे. भारताची सलामी लढत रविवारी अल नाहयान स्टेडियममध्ये थायलंडसोबत होणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा सहभाग आठ वर्षांपूवी होता. त्यावेळी भारताला आशियातील पॉवर हॉऊस आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व बहरीन या संघांकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. ही १७ वी स्पर्धा आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये २४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. २०१५ मध्ये भारताला स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यावेळी यजमान आॅस्ट्रेलिया संघ विजेता ठरला होता. भारतीय संघ दक्षिण कोरिया किंवा आॅस्ट्रेलिया या संघांप्रमाणे मजबूत नाही, पण त्यांना बहरीन, थायलंड व यूएई यांच्यासारख्या संघांकडून कडवे आव्हान मिळेल.
भारताचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कांस्टेनटाईन संघाच्या कामगिरीबाबत सकारात्मक आहेत. कारण संघाला सलग १३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला नाही. यादरम्यान संघाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि फिफा मानांकनामध्ये आपले दुसरे सर्वोत्तम स्थान मिळवले. भारतीय संघ सध्या मानांकनामध्ये ९७ व्या स्थानी आहे तर एकवेळ भारतीय संघ १७३व्या स्थानापर्यंत पिछाडीवर होता.
भारतीय संघ २३ पाहुण्या संघांमध्ये यूएईच्या राजधानीत दाखल होणार पहिला संघ ठरला. भारतीय संघ येथे २० डिसेंबरला दाखल झाला होता. २८ सदस्यीय संघ येथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सरावात व्यस्त आहे. आशिया कप स्पर्धेत खडतर आव्हानाला समोरे जावे लागणार असून भारतीय संघाला त्याची कल्पना आहे. कांस्टेनटाईन यांनी स्पर्धेपूर्वी बोलताना सांगितले की, ‘आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत. २३ खेळाडू आमच्यासाठी चांगला खेळ करतील, अशी आशा आहे. ’
आॅस्ट्रेलियन संघ जेतेपद कायम राखण्यासाठी स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्यांनी २०१५ मध्ये मायदेशात या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया व जपान हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी उत्सुक आहेत. दक्षिण कोरियन संघ ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीची
प्रतीक्षा संपविण्यास प्रयत्नशील आहे तर जपानने २०१८ च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाºया बेल्जियमला रशियात राऊंड १६ च्या लढतीत
कडवे आव्हान दिले होते. २००७ मध्ये जेतेपद पटकावणारा इराक संघही चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: From today's Asian Cup football tournament, India's opening game with Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.