तिरंगी फुटबॉल : मॉरिशसचा विजय अंतिम क्षणी हुकला,  अंतिम क्षणी सेंट किट्स आणि नेविसने साधली बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:13 AM2017-08-23T03:13:41+5:302017-08-23T03:13:47+5:30

भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मॉरिशसने तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या दुसºया सामन्यात सेंट किट्स आणि नेविस संघाला १-१ असे बरोबरीत रोखले.

Tricolor football: Mauritius's victory ends at the last moment; St Kitts and Nevis get equally convinced | तिरंगी फुटबॉल : मॉरिशसचा विजय अंतिम क्षणी हुकला,  अंतिम क्षणी सेंट किट्स आणि नेविसने साधली बरोबरी

तिरंगी फुटबॉल : मॉरिशसचा विजय अंतिम क्षणी हुकला,  अंतिम क्षणी सेंट किट्स आणि नेविसने साधली बरोबरी

Next

मुंबई : भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मॉरिशसने तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या दुसºया सामन्यात सेंट किट्स आणि नेविस संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. मुंबतील अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मॉरिशसने नियंत्रित खेळ करताना फिफा क्रमवारीत आपल्याहून सरस असलेल्या सेंट्स किट्स आणि नेविसला बरोबरीत रोखले.
मॉरिशसने पुन्हा एकदा आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना पहिल्या २० मिनिटांमध्येच गोल केला. फ्रेडरीक सराह याने १९व्या मिनिटाला शानदार हेडर करून चेंडूला गोलपोस्टची दिशा दिली. या दमदार गोलच्या जोरावर मॉरिशसने मध्यंतरासह जवळजवळ संपुर्ण सामन्यावर नियंत्रण राखले. परंतु, मॉरिशस एका गोलच्या जोरावर बाजी मारणार, असे दिसत असतानाच सेंट किट्स आणि नेविस यांनी
जोरदार प्रत्युत्तर देताना ८७व्या मिनिटाला रॉजर किमारीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी पुनरागमनाचे खूप प्रयत्न केले. परंतु, गोल करण्यात अपयश आल्याने अखेर सामना १-१ असा बरोबरीमध्ये सुटला.
मॉरिशसने अपेक्षित खेळ करताना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याजोरावर त्यांनी १९व्या मिनिटालाच खाते उघडले. डिफेंडर पास्कल डॅमियन बालिसनने केलेल्या क्रॉसवर सराहने अप्रतिम हेडर करत गोल केला. यानंतर, सामन्याच्या अंतिम क्षणी फॉरवर्ड टिशान हेनले याच्या पासवर किमारीने चेंडूला गोलपोस्टची दिशा देत संघाला बरोबरी साधून दिली.
आता, २४ आॅगस्टला याच मैदानावर सेंट किट्स आणि नेविस संघ यजमान भारताविरुद्ध लढेल.

Web Title: Tricolor football: Mauritius's victory ends at the last moment; St Kitts and Nevis get equally convinced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.