वाईट बातमी; दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:55 PM2021-08-05T20:55:37+5:302021-08-05T20:56:11+5:30
भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत असताना गुरूवारी क्रीडा चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली.
भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत असताना गुरूवारी क्रीडा चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली. १९५६ ( मेलबर्न) आणि १९६० ( रोम) च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणारे गोलरक्षक एस एस बापू नारायम ( Two time Football Olympian and goalkeeper S S 'Babu Narayan passed away) यांचे ठाणे येथील राहत्या घरी निधन झाले. १२ नोव्हेंबर १९३४ साली केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता.
त्यांनी स्थानिक स्पर्धेत कॅल्टेक्स व टाटा एससी क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. १९६४साळी संतोष ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय माटुंगा इंडियन जिमखाना आणि माटुंगा अॅथलेटिक क्लबसाठीही ते खेळले होते. २०१३मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशननं त्यांच्या योगदानाप्रती सत्कार केला होता.