UEFA Champions League: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाणं एकदम खणखणीत; विश्वविक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:57 AM2018-11-28T10:57:29+5:302018-11-28T11:21:18+5:30

UEFA Champions League :युव्हेन्टस क्लबने बुधवारी 1-0 अशा फरकाने व्हॅलेन्सिया क्लबवर मात करून चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या बाद फेरीत एटित प्रवेश केला.

UEFA Champions League : Cristiano Ronaldo's reach milestone, complete 100 champions league victory | UEFA Champions League: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाणं एकदम खणखणीत; विश्वविक्रमाला गवसणी

UEFA Champions League: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाणं एकदम खणखणीत; विश्वविक्रमाला गवसणी

Next
ठळक मुद्देख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमाला गवसणीचॅम्पियन्स लीगमध्ये शंभर सामने जिंकणारा पहिलाच खेळाडू युव्हेन्टस क्लबचा बाद फेरीत प्रवेश

माद्रिद, चॅम्पियन्स लीग फुटबॉल: युव्हेन्टस क्लबने बुधवारी 1-0 अशा फरकाने व्हॅलेन्सिया क्लबवर मात करून चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या बाद फेरीत ऐटीत प्रवेश केला. या सामन्यात क्रोएशियाच्या मारियो मॅनझुकिचने गोल केला. पण, नेहमीप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डो भाव खावून गेला. मॅनझुकिचच्या या विजयी गोलमध्ये रोनाल्डोची सिंहाचा वाटा आहे. त्याने व्हॅलेन्सियाच्या खेळाडूंना चकवून मॅनझुकिचला गोल करण्याची सोपी संधी निर्माण करून दिली. या कौशल्याबरोबरच रोनाल्डो आणखी एका कारणाने चर्चेत राहिला आणि ते म्हणजे त्याने केलेल्या विश्वविक्रमाने. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात विजयाचे शतक साजरे करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला. 



मॅनझुकिचने चॅम्पियन्स लीगमधील तिसऱ्या गोलची नोंद केली. यंदाच्या हंगामातील हा त्याचा पहिलाच गोल ठरला. याआधी त्याने गतहंगामात उपांत्यपूर्व फेरीत रेयाल माद्रिदविरुद्ध दोन गोल केले होते. इटालियन चॅम्पियन युव्हेन्टसला पहिल्या सत्राव गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पाऊलो डिबाला, मॅनझुकिच आणि रोनाल्डो या तगड्या आक्रमणपटूंना स्पॅनिश क्लबची बचावभींत भेदताना अपयश येत होते. मात्र त्यांनी दुसऱ्या सत्रात खेळ सुधारला आणि एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. व्हॅलेन्सियाने कमबॅक करण्याची संधी गमावली. 


या विजयाबरोबर युव्हेन्टसने चॅम्पियन्स लीगच्या साखळी फेरीत सलग सहाव्या विजयाची नोंद केली. याशिवाय त्यांनी प्रथमच सलग पाचव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. पण, या पलीकडे रोनाल्डोने कोणालाही न जमलेला विक्रम नावावर केला. त्याच्यासाठी हा चॅम्पियन्स लीगमधील शंभरावा विजय ठरला. चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर विजय नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने मँचेस्टर युनायटेड व रेयाल माद्रिदकडून अनुक्रमे 26 व 71 विजय मिळवले आहेत, तर युव्हेन्टसकडू हा त्याचा तिसराच विजय ठरला.


ऑक्टोबर 2003 मध्ये त्याने मॅंचेस्टर युनायटेडकडून चॅम्पियन्स लीगमध्ये पदार्पण केले होते. स्टुट्गार्टविरुद्धच्या त्या सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र पुढच्याच सामन्यात रेंजर्स क्लबला पराभूत करून त्याने पहिल्या विजयाची चव चाखली. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक 121 गोल्सचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

Web Title: UEFA Champions League : Cristiano Ronaldo's reach milestone, complete 100 champions league victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.