UEFA Nations League : विश्वविजेत्या फ्रान्सचा जर्मनीला धक्का, पण चर्चा ग्रिझमच्या हेडरची...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:31 AM2018-10-17T09:31:56+5:302018-10-17T09:32:17+5:30
UEFA Nations League: रशियात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्स संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला 2-1 अशी पराभवाची चव चाखवली.
पॅरिस : रशियात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्स संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला 2-1 अशी पराभवाची चव चाखवली. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत 2014 च्या विजेत्या जर्मनीला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर प्रशिक्षक ज्योकीम लो यांच्यासह संघातील अनेक खेळाडूंवर टीका झाली. बुधवारच्या या पराभवानंतरही त्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, या सामन्यानंतर चर्चा रंगली ती अँटोइने ग्रिझमनच्या हेडरची. त्याने हेडरद्वारे केलेल्या गोलला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे.
🇫🇷 Goals for France:
— UEFA Nations League (@UEFAEURO) October 16, 2018
2⃣7⃣ Karim Benzema ⚽️
2⃣6⃣ Antoine Griezmann ⚽️
2⃣6⃣ Sylvain Wiltord ⚽️#NationsLeaguepic.twitter.com/tCBRgzviWg
टोनी क्रुसच्या ( 14 मि. ) पेनल्टी स्पॉट किकच्या गोलने जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतरानंतर फ्रान्सकडून पलटवार झाला. ग्रिझमनने 62 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली. ल्युकास हर्नांडेझच्या क्रॉसवर ग्रिझमनने हेडरद्वारे सुरेख गोल केला. त्यात 80 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकची भर पडली. ग्रिझमनने हाही गोल करत फ्रान्सचा विजय निश्चित केला.
Nice goal Griezmann👌👌👌 #fradui#FRAGERpic.twitter.com/vsdLkelgT6
— Maurice. (@Locoboy__) October 16, 2018
Griezmann's body reacted faster than his mind.#FRAGER#AllezLesBleuspic.twitter.com/1LF3BRdwIi
— fuboTV (@fuboTV) October 16, 2018
That's a pretty cool goal by Antoine Griezmann there pic.twitter.com/w8izZ0mLVf
— S⚽ccerapy (@soccerapy) October 16, 2018