अमेरिका, मेक्सिको, कॅनडा २०२६च्या फुटबॉल विश्वचषकाचे संयुक्त यजमान, फिफाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:32 AM2022-06-18T10:32:57+5:302022-06-18T10:33:48+5:30

FIFA World Cup 2026: २०२६ चा फिफा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या आशयाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. 

United States, Mexico, Canada Co-host of 2026 FIFA World Cup, FIFA's landmark decision | अमेरिका, मेक्सिको, कॅनडा २०२६च्या फुटबॉल विश्वचषकाचे संयुक्त यजमान, फिफाचा ऐतिहासिक निर्णय

अमेरिका, मेक्सिको, कॅनडा २०२६च्या फुटबॉल विश्वचषकाचे संयुक्त यजमान, फिफाचा ऐतिहासिक निर्णय

googlenewsNext

माॅस्को : २०२६ चा फिफा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या आशयाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. 
फिफाच्या इतिहासात संयुक्तपणे यजमानपद सोपविण्याची ही पहिलीच वेळ असेल.  पुढील आयोजनासाठी फिफाने १६ यजमान शहरांची घोषणा केली. आता ३२ ऐवजी ४८ संघांचा स्पर्धेत सहभाग असेल. २०२२ चा विश्वचषक यंदा कतारमध्ये २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत असून, त्यात ३२ संघ सहभागी होतील.
२०२६ ला ९० पैकी ६० सामन्यांचे आयोजन अमेरिकेत, तर कॅनडा आणि मेक्सिकोत प्रत्येकी १०-१० सामन्यांचे आयोजन होईल.  अमेरिकन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोर्डेरियो यांनी ही अद्भूत घोषणा असल्याचे संबोधून अमेरिकन फुटबॉल विश्वासाठी हा मोठा क्षण असल्याचे सांगितले.

मोरोक्कोला अपयश
माॅस्कोतील फिफा काँग्रेसमध्ये  अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी २०२६ च्या यजमानपदाची संयुक्तपणे दावेदारी सादर केली. या तीन देशांनी मोरोक्कोला पराभूत केले. २०० वर राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी मतदान केले. या तीन देशांना १३४ तर मोरोक्कोला केवळ ६५ मते मिळाली. 

 सर्वात लोकप्रिय आयोजन
फुटबॉल जगात लोकप्रिय खेळ असून फिफा विश्वचषकदेखील सर्वाधिक लोकप्रिय आयोजन आहे. प्रेक्षकक्षमता आणि लोकप्रियतेच्या तुलनेत फिफाचे आयोजन ऑलिम्पिकला टक्कर देते. १९३० पासून सुरू झालेली ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात लक्षवेधी ठरते. दर चार वर्षांनी हे आयोजन केले जाते.  मागच्या वेळी ही स्पर्धा फ्रान्सने जिंकली होती.  १९३० चा पहिला विश्वचषक विजेता मात्र उरुग्वे होता.

सामना स्थळे
अमेरिका :  अटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एंजिलिस, मियामी, न्यूयाॅर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल या शहरात सामने होतील.
मेक्सिको : गौडालाजारा, मेक्सिको सिटी, मॉन्टेरी. कॅनडा : टोरंटो, व्हँकूअर.

२० वर्षांपूर्वीचे आयोजन
जपान-दक्षिण कोरिया यांनी २० वर्षांआधी २००२ ला  संयुक्तपणे फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. माॅस्को शहरात झालेल्या फिफाच्या ६८ व्या काँग्रेसमध्ये जगातील राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या बाजूने मतदान केले.

Web Title: United States, Mexico, Canada Co-host of 2026 FIFA World Cup, FIFA's landmark decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.