विश्वचषकात प्रथमच ‘वॉर’ प्रणालीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:27 AM2018-06-17T03:27:24+5:302018-06-17T03:27:24+5:30
व्हिडीओ सहायक रेफ्री अर्थात (वॉर) प्रणालीचा फिफा विश्वचषकात पहिल्यांदा वापर होत आहे. याचा पहिला लाभ फ्रान्सला झाला.
Next
कजान : व्हिडीओ सहायक रेफ्री अर्थात (वॉर) प्रणालीचा फिफा विश्वचषकात पहिल्यांदा वापर होत आहे. याचा पहिला लाभ फ्रान्सला झाला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध नव्या प्रणालीअंतर्गत फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली.
क गटाच्या सामन्यात अॅन्थोटी ग्रीझमान याला उत्तरार्धात पेनल्टी बॉक्स एरियात प्रतिस्पर्धी खेळाडूने पाडले. रेफ्रीने पेनल्टी दिली नाही,
पण वॉर अधिकाऱ्याने समीक्षा केल्यानंतर ही पेनल्टी असल्याचा निर्णय दिला. त्यावर ग्रीझमानने गोल नोंदवित फ्रान्सला आघाडी मिळवून दिली.