Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:55 AM2020-05-16T10:55:33+5:302020-05-16T10:56:54+5:30
लिओनेल मेस्सी हा तसा लाजाळू व्यक्ती आहे आणि सोशल मीडियावरही तो त्याच्या कुटुंबीयांचे फार फोटो पोस्ट करत नाही.
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेमल मेस्सी मैदानावर परतण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. त्यानं सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, सध्या मेस्सी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मेस्सी हा तसा लाजाळू व्यक्ती आहे आणि सोशल मीडियावरही तो त्याच्या कुटुंबीयांचे फार फोटो पोस्ट करत नाही. पण, त्यानं एका म्युझिक व्हिडीओसाठी पत्नीसोबत लिपलॉप केलं आणि चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. हा व्हिडीओ मेस्सीचा मुलगा शूट करत होता आणि त्यामुळे चाहते आणखी भडकले.
पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला
या म्यूझिक व्हिडीओत 113 कपल्स एकमेकांना किस करताना पाहायला मिळत आहेत. स्पॅनिशमध्ये तयार केलेल्या या गाण्याचं नाव 'एनटेस क्यू एल मुंदो' असे आहे आणि याचा अर्थ हे जग संपण्यापूर्वी, असा होतो. चाहत्यांना मेस्सीचे हे कृत्य आवडले नाही आणि त्यांनी बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूला चांगलेच ट्रोल केले. मुलांसमोर असं कृत्य करणे, शोभा देत नाही, अशीही काहींनी प्रतिक्रिया दिली. काहींनी तर ख्रिस्तियानो रोनाल्डो तुझ्यापेक्षा चांगले किस करू शकतो, असा दावा केला.
दरम्यान, बार्सिलोना क्लबचा सुपरस्टार मेस्सी आणि मँचेस्टर सिटी क्लबचे सध्याचे प्रशिक्षक गॉर्डिया यांनी बार्सिलोना येथील हॉस्पिटल्सना प्रत्येकी 1 मीलियन युरो म्हणजेच 8 कोटी रक्कम मदत म्हणून दिली आहे. ही मदत कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या सार्वजनिक रुग्णालयांना देण्यात येणार आहे. जेणेकरून उपचारांसाठी निधी कमी पडू नये. हॉस्पिटल क्लिनिक हे बार्सिलोनातील सार्वजनिक हॉस्पिटल आहे आणि मेस्सीनं त्यांना 8 कोटी रुपये दिल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. गॉर्डिया यांनीही औषधं आणि साहित्य खरेदी करण्यासाठी 8 कोटींची मदत केल्याचेही त्यांनी मान्य केले. हॉस्पिटल क्लिनिककडून या मदतीचे स्वागत करण्यात आले आणि या निधीचा योग्य तो वापर केला जाईल, अस आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले.
पाहा व्हिडीओ...