सोशल डिस्टन्सिंगसाठी बंद केलं स्टेडियम, पण Viral Videoचा शेवट पाहून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:13 IST2020-06-09T16:13:01+5:302020-06-09T16:13:30+5:30
नियमांचे काटेकोर पालन करून जगभरात काही ठिकाणी क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंगसाठी बंद केलं स्टेडियम, पण Viral Videoचा शेवट पाहून बसेल धक्का!
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 72 लाख 18,771 इतका गेला आहे. त्यापैकी 35 लाख 54,625 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 4 लाख 09,104 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा मागील अडीच महिन्यांपासून बंद होत्या. पण, आता हळुहळू क्रीडा स्पर्धा पूर्वपदावर येत आहेत.
Cricket is Back : वेस्ट इंडिजचा संघ ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल!
नियमांचे काटेकोर पालन करून जगभरात काही ठिकाणी क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. खेळाडूंना प्रेक्षकांविना खेळावं लागत आहे. पण, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत बंद स्टेडियममध्ये (प्रेक्षकांविना) फुटबॉल सामना सुरू असल्याचे दिसत आहे. पण, व्हिडीओच्या अखेरीच जे डोळ्यासमोर येतं, ते पाहून आली लहर, केला कहर असच म्हणायची वेळ येईल.
सीरियातील हा फुटबॉल सामना आहे. सीरियातील कोरोना रुग्णांची संख्या 144 इतकी आहे आणि त्यापैकी 6 रुग्ण दगावले असून 62 रुग्ण बरे झाले आहेत. तरीही येथे नियमांची आखणी करूनच फुटबॉल सामन्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामना होताना दिसत आहेत. पण, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
पाहा व्हिडीओ...
Football Stadium closed for Social Distancing.
— PIYUSH 🇮🇳 (@writetopiyush) June 8, 2020
But watch till the end. You will be surprised. 🤣🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/YjvkNTpAEj
"Stadium closed for social distancing. Watch till the end" 🤣🤣🤣#அடேய்...கிழிஞ்சுது #கிருஷ்ணகிரிpic.twitter.com/eZWHLEYA0v
— விஷ்வா I Viswa I (@ChennaiViswa) June 7, 2020
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय
इशांत शर्मा अडचणीत सापडणार? डॅरेन सॅमीवरील सहा वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल!