Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:42 AM2020-03-16T10:42:59+5:302020-03-16T10:44:26+5:30

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुढे आल्याचं वृत्त रविवारी वाऱ्यासारखं पसरलं.

'We are not a hospital'; Cristiano Ronaldo's hotel refutes reports of being a paid-up coronavirus infirmary svg | Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

Next

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुढे आल्याचं वृत्त रविवारी वाऱ्यासारखं पसरलं.  रोनाल्डोनं पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सची रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले असून तेथे कोरोना संक्रमित लोकांच्या उपचाराचा सर्व खर्च रोनाल्डो उचलत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. जगभरात रोनाल्डोच्या या समाजसेवेचा उदोउदो झाला. रोनाल्डोनं स्वतःहून तशी कोणतीच घोषणा केली नसली तरी जगभरातील अनेक फुटबॉल वेबसाईट्सने तसे वृत्तही प्रसिद्ध केलं आणि त्याचाच आधार घेत ही बातमी जगभर पसरली. पण, खरंच रोनाल्डोनं त्याच्या हॉटेल्सचे हॉस्पिटल्समध्ये रुपांतर केले आहे का? जाणून घेऊया सत्य...

PESTANA CR7 नावाच्या हॉटेल्सची चेन पोर्तुगालमध्ये आहे. जगभरात १ लाख ६० हजार कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत आणि त्यातील मृतांचा आकडा ६००० वर गेला आहे. पोर्तुगालमध्ये हा आकडा ७६ वरून आता २४५ इतका वाढला आहे. त्यातच स्पॅनिश वृत्तपत्र मार्सा यांनी कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डो त्याच्या हॉटेल्सचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार असल्याचे वृत्त दिले. पण, रोनाल्डोच्या लिस्बन येथील हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. असा कोणताही विचार नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

''आम्ही हॉटेल चालवतो आहे. त्याचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी रोजच्यासारखाच आहे आणि हे हॉटेलच राहणार आहे. आम्हाला अनेक मीडिया प्रतिनिधिंचे फोन आले,'' असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.  

दरम्यान, पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि युव्हेंटस क्लबचा खेळाडू रोनाल्डो सध्या सीरि ए लीग रद्द झाल्यामुळे मायदेशात आपल्या कुटुंबीयांसोबत आहे. त्यानं जगभरातील त्याच्या चाहत्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला,''आज जग कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी प्रत्येकानं स्वतःची नेहमीपेक्षा अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मी आज तुमच्याशी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, एक बाप म्हणून सवांद साधत आहे. मी सर्वांना विनंती करतो की जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. एखाद्याचं आयुष्य वाचवणे हे प्राधान्य आहे.''

Web Title: 'We are not a hospital'; Cristiano Ronaldo's hotel refutes reports of being a paid-up coronavirus infirmary svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.