आम्ही बलाढ्य संघांवर दडपण आणू, भारतीय कोच माटोस यांना विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:45 AM2017-09-29T00:45:47+5:302017-09-29T00:45:55+5:30
खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
नवी दिल्ली : खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला ‘ब’ गटात कोलंबिया, अमेरिका आणि घाना संघासह स्थान मिळाले आहे. यावर माटोस म्हणाले, ‘आमचे खेळाडू संपूर्ण शक्तिनिशी खेळल्यास बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू शकतील. भक्कम संघांपुढे आव्हान सादर करण्याची आमच्यात जिद्द व आहे. सामन्यात विजय मिळविण्याची ५ टक्के जरी संधी मिळाली तरी आम्ही विजयाचा प्रयत्न करणार आहोत.’
भारतीय वरिष्ठ संघाचा गोललक्षक गुरप्रीतसिंग संधू म्हणाला, ‘भारताने यजमान होण्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण सकारात्मक असेल. यामुळे भारतात फुटबॉलची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. आम्हाला नाही पण सध्याच्या मुलांना हे मोठे व्यासपीठ मिळाले, ही अभिमानास्पद बाब आहे.’
घरच्या परिस्थितीचा लाभ घेऊ : सुरेशसिंग
जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारताचा समावेश होत नसला तरीही स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असे मिडफिल्डर सुरेशसिंग वांगजाम याने म्हटले आहे. कुठलाही संघ पराभवाच्या दृष्टीने कधीच खेळत नाही. विजयासाठीच प्रयत्न करतो.
आम्हीदेखील स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर चांगली कामगिरी करण्यासाठीच उतरणार आहोत.’ ब्रिक्स कप तसेच एएफसी १६ वर्षे गटाच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असलेला मणिपूरचा हा खेळाडू सर्वाधिक सामने खेळणाºयांपैकी एक आहे.