भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:34 AM2018-07-19T11:34:00+5:302018-07-19T11:34:38+5:30

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे.

Will Indian football team playing in Asian Games? | भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

Next

मुंबई - आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. एखाद्या खेळाप्रती असलेल्या जनसामान्य आणि खेळाडूंच्या भावना लक्षात घेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पात्रता असूनही अनेक खेळाडूंना किंवा संघांना केवळ नियमांची पुर्तता करू शकत नसल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळता येत नव्हते. यापूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. आयओएने पाठवलेल्या अंतिम यादीवर क्रीडा मंत्रालय शिक्कामोर्तब करत होते, असे मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. 
काय आहे पत्रात वाचा...


पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठीचा चमू जाहीर केल्यापासून आयओएवर टीका सुरूच आहे. त्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएविरोधात उघडउघड बंड पुकारले आहे. भारताच्या पुरूष व महिला फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूतून डावलल्यानंतर महासंघाने आयओएवर दूरदृष्टी नसलेले आणि अकार्यक्षम, अशी टीका केली होती. त्यावर जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आठमध्ये नसल्याचे कारण देत आयओएने संघ पाठवता येणार नसल्याचा नियम सांगितला होता. पण, क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानंतर फुटबॉल संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

Web Title: Will Indian football team playing in Asian Games?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.