विश्वचषक विजेता फुटबॉलपटू डेव्हिड सिल्वा निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 11:54 AM2018-08-14T11:54:58+5:302018-08-14T11:55:40+5:30
मँचेस्टर सिटी क्लबचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्वा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर ही घोषणा केली.
Next
लंडन - मँचेस्टर सिटी क्लबचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्वा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर ही घोषणा केली. 2010च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचा तो सदस्य होता. त्याशिवाय त्याने संघासोबत 2008 आणि 2010 चा युरो चषकही उंचावला. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 126 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले.
'आयुष्यात जे मिळवायचे होते, ते मिळवण्यात मी यशस्वी झालो. त्यामुळे आनंदाने निवृत्त होत आहे. संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील,' असे त्याने ट्विट केले.
Gracias, suerte y hasta siempre! 🇪🇸 pic.twitter.com/mIM1k45pfg
— David Silva (@21LVA) August 13, 2018
नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील रशियाविरूद्धचा सामना त्याचा कारकिर्दीतला शेवटचा ठरला. विश्वचषक स्पर्धेनंतर स्पेनच्या आंद्रेस इनिएस्टा आणि गेरार्ड पिक्यू यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती.