१९९८च्या विजयाप्रमाणेच विश्वविजेतेपद शानदार : डेसचॅम्प्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:48 PM2018-07-16T23:48:14+5:302018-07-16T23:48:28+5:30
दिदिएर डेसचॅम्प्सने विश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध ४-२ ने विजयानंतर पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या साथीने जल्लोष करीत डान्स केला
मॉस्को : दिदिएर डेसचॅम्प्सने विश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध ४-२ ने विजयानंतर पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या साथीने जल्लोष करीत डान्स केला आणि त्यांच्यावर शॅम्पेन उडविल्यानंतर सांगितले की, ‘फ्रान्स आनंदसागरात बुडालेला आहे.’
प्रशिक्षक पत्रकार परिषदेत बोलण्यास सुरुवात करीत असतानाच मॉस्कोच्या लुजनिकी स्टेडियममध्ये पत्रकारांची गर्दी असलेल्या रुममध्ये खेळाडू दाखल झाले. यावेळी डिफेंडर बेंजामिन मेंडी जल्लोषाचे नेतृत्व करीत होता. तो शर्ट काढून डान्स करीत होता.
डेसचॅम्प्सनी यानंतर स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करीत फ्रान्सच्या दुसऱ्या विश्वविजेतेपदावर आपले मत व्यक्त केले. ते १९९८ मध्ये पॅरिसमध्ये ब्राझीलविरुद्ध ३-० ने विजय मिळवणाºया फ्रान्स संघाचे कर्णधारही होते. डेसचॅम्प्स म्हणाले,‘माझी कथा खेळाडूंसोबत जुळलेली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एक खेळाडू म्हणून २० वर्षांपूर्वी मला याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. ते सर्व फ्रान्समध्ये घडले होते. आज या खेळाडूंनी
जो पराक्रम केला तोही तेवढाच महत्त्वाचा व तेवढाच शानदार आहे.’ डेसचॅम्प्स पुढे म्हणाले, ‘आजच्या युवा पिढीत माझा २२ वर्षांत एक मुलगा आहे. आम्ही विश्वविजेते झालो त्यावेळी ही पिढी छोटी होती. पण, आता जी पिढी १०, १५ किंवा २० वर्षांची आहे, त्यांच्याकडे अनुभव व खुशी आहे.’
खेळाडू व प्रशिक्षक म्हणून विश्वविजेतेपद पटकावणारे डेसचॅम्प्स जगातील तिसरे व्यक्ती आहेत. ब्राझीलचे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रेंज बॅकेनबायर यांचा या यादीत समावेश आहे.