FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 05:22 AM2017-10-08T05:22:14+5:302017-10-08T07:05:50+5:30

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की.

 World Cup soccer under-17: Challenge of Group of Death will be played today | FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

Next

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की. सराव सामन्यांत इंग्लंडने न्यूझीलंडला ३-२ असे नमवले होते आणि हीच कामगिरी कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मँचेस्टर युनायटेडचे स्टार खेळाडू अँजेल गोम्स आणि जाडेन सांचो यांच्या समावेशामुळे इंग्लंड कागदावर मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, १९९७ नंतर पहिल्यांदाच चिली या स्पर्धेत खेळत आहे.

‘इ’ गटयुवा विश्वचषकातील आजचे सामने...
फ्रान्स विजयी सलामीसाठी सज्ज...
युरोपियन चॅम्पियन फ्रान्स युवा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या नवख्या न्यू कॅलेडोनिया संघाविरुद्ध बाजी मारून विजयी सलामीच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भलेही फ्रान्स वर्चस्व राखून असेल, परंतु १७ वर्षांखालील स्पर्धांमध्ये फ्रान्सला लौकिकास साजेशी कामगिरी करताना आलेली नाही. मात्र, १७ वर्षांखालील युरो कप स्पर्धेतील यशामुळे यंदा त्यांचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. २००१ मध्ये विश्वविजेता बनलेल्या फ्रान्सने ५ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे.

जपान लढणार होंडुरासविरुद्ध...
आशिया खंडातील मजबूत संघ असा लौकिक असलेला जपान संघ सलामीला होंडुरासविरुद्ध भिडेल. १९९३ मध्ये युवा विश्वचषकाचे यजमानपद सांभाळून पदार्पण केलेल्या जपानने पहिल्याच स्पर्धेत उपांत्यपूृव फेरी गाठली होती. २०११ ची स्पर्धा गाजवताना जपानने अर्जेंटिना, फ्रान्स आणि जमैका या बलाढ्य संघांना मागे टाकत गटविजेतेपद पटकावत खळबळ माजवली होती. काही मैत्री लढती खेळून जपान या स्पर्धेत सहभागी झाली असून या लढतीत त्यांना संभाव्य विजेते मानले जात आहे. दुसरीकडे, होंडुरासने २००७ नंतर नियमितपणे युवा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. २०१३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत होंडुरासने उपांत्यपूृर्व फेरी गाठली होती.

मेक्सिकोपुढे इराकचे आव्हान...
दोन वेळच्या विजेत्या मेक्सिकोला आपल्या पहिल्याच सामन्यात इराकच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. २००५ मध्ये पहिले विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर या संघाने सातत्याने आपली छाप पाडली. २०११ मध्ये पुन्हा विश्वविजेतेपद पटकावलेल्या मेक्सिकोने २०१३ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. दुसरीकडे, इराकने याआधी केवळ २०१३ मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला. परंतु, या संघात आश्चर्यकारक निकाल नोंदवण्याची क्षमता असल्याने मेक्सिको इराकला गृहीत धरण्याची चूक करणार नाही. इराकने १६ वर्षांखालील आशिया चषक जिंकून या स्पर्धेतील तिकीट निश्चित केले आहे.

‘एफ’ गट
स्थळ :
सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता
स्टार इंग्लंडवर नजरा
(सायंकाळी ५ वाजता)

Web Title:  World Cup soccer under-17: Challenge of Group of Death will be played today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.