यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:41 AM2017-10-05T03:41:50+5:302017-10-06T11:40:34+5:30
१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे.
सचिन कोरडे
पणजी : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे. हा संघ मजबूत मानला जात आहे. त्यामुळे भारतासाठी सुरुवात सोपी नसेल. असे असले तरी प्रशिक्षक मातोस यांनी आपल्या काही शिलेदारांवर विश्वास दाखवला आहे. भारतीय संघातील पाच खेळाडू मुख्य मानले जात असून त्यांच्यावर बरीच भिस्त असेल.यात अनिकेत जाधव, कोमल थटाल, संजीव स्टॅलीन, कर्णधार अमरजीत सिंग आणि अन्वर अली यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवरील संक्षिप्त नजर...
भारतीय संघ: गोलरक्षक - धीरज सिंग, प्रभसुखान गिल, सनी धालिवाल. बचावपटू- बोरीस सिंग, जितेंद्र सिंग, अन्वर अली, हेद्री अंतोनी, नमित देशपांडे. मध्यरक्षक- सुरेश सिंग, निंथिओगांबा मितेई, अमरजीत सिंग कियाम, अभिजीत सरकार, कोमल थटाल, जॅक्सन सिंग, नांगडोम्बा नाओरेम, राहुल कनोली प्रवीण, मोहम्मद शाहजान. आघाडीपटू- राहिम अली, अनिकेत जाधव.
अमरजीत सिंग कियाम...
प्रशिक्षक मातोस यांनी या खेळाडूतील नेतृत्वगुण हेरले. या गुणांमुळेच त्याला सर्व खेळाडूंनी कर्णधार म्हणून निवडले. खेळाडूंच्या पसंतीनेच कर्णधाराची निवड ही अभिनव कल्पना मातोस यांचीच. सर्वाधिक मतदान मिळवून अमरजीतने जिंकून घेतले. त्याच्यावर इतर खेळाडूंचाही भरवसा आहे. अत्यंत शांत आणि मिडफिल्डवर चपळ असणारा हा खेळाडू प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकतो. मूळचा मणिपुरी असणारा हा खेळाडू चंदिगड अकादमीतून खेळत राष्ट्रीय स्तरावर पोहचला.
अनिकेत जाधव...
कोल्हापूरच्या (महाराष्ट्र) या खेळाडूने १६ वर्षांखालील एएफसी चषकात लक्ष वेधले होते. त्या वेळीच त्याने विश्वचषकासाठी आपली ‘सीट’ बुक केली होती. १४ वर्षांचा असतानाच त्याने एफसी बेयर्न म्युनिच युथ चषकात भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा एक उत्तम स्ट्रायकर. मातोस यांच्या पसंतीचा. ‘फ्रंट लिडिंग अटॅक’ याच्याकडेच असेल. भारतीय फुटबॉलमधील हा उगवता तारा आहे.
कोमल थटाल...
सिक्कीमसारख्या दुर्गम भागात जन्मलेला हा खेळाडू कष्टाळू. भारतीय संघाचा ‘चीफ प्लेमेकर’ म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. ब्राझील आणि उरुग्वे संघाविरुद्ध गोल नोंदवणारा हा एकमेव खेळाडू आहे. १६ वर्षांखालील एएफसी चषकात कोमलची चर्चा अधिक होती. अत्यंत जिद्दी, वेगवान अािण चपळता ही कोमलची खासियत आहे.
संजीव स्टॅलीन..
संघाचा ‘बॅकबोन’ खेळाडू म्हणून ओळख.संपूर्ण मैदानात खेळण्यास सक्षम. बंगळुरूत जन्मलेल्या या खेळाडूचे पाय मजबूत आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला चकवा देत चेंडू आपल्या ताब्यात घेण्याची कला याला चांगलीच अवगत आहे. त्यामुळे स्ट्रायकर्सला संधी मिळवून देण्यात याचा वाटा अधिक असेल.
अन्वर अली...
एप्रिल २०१७ मध्ये हा भारतीय संघात सामील झाला. मार्चमध्ये झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय संघाला मिनर्वा क्लबने एकमेव गोलने पराभूत केले होते. त्या वेळी मातोस यांची नजर अन्वर अलीवर पडली. माजी प्रशिक्षक निकोल अ?ॅडम यांनीही अन्वरची शिफारस केली होती.