झिनेदिन झिदान यांची रीयल माद्रिदला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 05:30 PM2018-05-31T17:30:08+5:302018-05-31T17:30:08+5:30
रियल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीगचे पाच दिवसही लोटले नाहीत तर त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबला सोडचिठ्ठी दिली आहे.
पॅरिस : रियल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीगचे पाच दिवसही लोटले नाहीत तर त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबला सोडचिठ्ठी दिली आहे. झिदान यांनी रीयाल माद्रिदला तीन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले होते.
" प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टी बदलत असतात. मीदेखील थोडा बदल करायचे ठरवले आहे. त्यामुळेच मी रियाल माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी देत आहे, " असे झिदान यांनी सांगितले.
राफाएल बेनिटेझ यांच्यानंतर झिदान यांनी रीयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. आतापर्यंत झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रीयाल माद्रिद 149 सामने खेळली. या 149 सामन्यांमध्ये माद्रिदने 104 सामन्यांत विजय मिळवला, तर 29 सामन्यांमध्ये त्यांनी बरोबरी साधली. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने 9 जेतेपदे पटकावली.
झिदान यांनी सांगितले की, " माद्रिद या क्लबवर माझे अपार प्रेम आहे. संघामध्ये अजूनही विजयाची भूक कायम आहे. पण मला थोडा बदल हवा म्हणून मी क्लब सोडत आहे. "