पाेलिसांकडून १ लाख २० हजारांचा मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:40+5:302021-04-06T04:35:40+5:30
चामोर्शी : चामोर्शी पोलीस स्टेशनला ३१ मार्च रोजी प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी ...
चामोर्शी : चामोर्शी पोलीस स्टेशनला ३१ मार्च रोजी प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी अवैध धंद्यांवर आळा घालणे सुरू केले असून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यात विविध ठिकाणच्या कार्यवाहीत १ लाख २० हजारांचा मोहसडवा नष्ट केला. तसेच सव्वा लाखाची माेहफुल दारू, तंबाखू व दुचाकी पकडली.
१ एप्रिल राेजी चामोर्शीपासून १३ किमी अंतरावरील विष्णुपूर जंगल परिसरात मोहादारू गाडण्यासाठी टाकून ठेवलेला ४०० लीटर मोहसडवा किंमत ४० हजार व २०० लीटर हातभट्टी मोहा दारू किंमत ४० हजार पकडून प्रियदास चरण सरकार वय ५१, वर्ष रा. विष्णुपूर यांचेवर कलम ६५ ई, फ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
२ एप्रिल रोजी चामोर्शीपासून १० किमी अंतरावर असलेल्या मार्कंडादेव येथे खुशाल दुधबळे यास सुगंधित तंबाखू किंमत १२ हजार रुपये, मोटार सायकलसह किंमत ३० हजार रुपये असा एकूण ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
त्याचप्रमाणे दिनांक ३ एप्रिल रोजी चामोर्शीपासून २५ किमी अंतरावरील पांढरीभटाळ येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ४०० लीटर मोहदारू किंमत ८० हजार व ८०० लीटर मोहा सडवा किंमत ८०हजार असा एकूण १ लाख ६०हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करून इसम नामे सुरेश पवार, वय ३६ वर्ष, लखन जाधव वय २८ वर्ष, मच्छिंद्र राठोड वय ४० वर्ष, भजनीबाई राठोड वय ५० वर्ष, हरीचंद्र पवार वय ४५ वर्ष, प्रकाश जाधव वय ३५वर्ष, विक्रम राठोड वय ७९ वर्ष महिला नामे रशिका पवार सर्व रा. पांढरीभटाड यांचेवर कलम ६५ ई, फ,८३ महा.दा.का. प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागन्नाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, पल्लवी वाघ, पोहवा जोगेश्वर वाकुडकर, पो.शि. विलास गुंडे, सतीश जाधव, राकेश टेकाम आदींनी केली. २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त असून चामोर्शी परिसरातील अवैध दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले असून चामोर्शी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे.