आठवीपर्यंतचे १ लाख ३१ हजार विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:36 AM2021-04-06T04:36:07+5:302021-04-06T04:36:07+5:30

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात ...

1 lakh 31 thousand students up to 8th standard passed without examination | आठवीपर्यंतचे १ लाख ३१ हजार विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

आठवीपर्यंतचे १ लाख ३१ हजार विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

Next

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १ लाख १३ हजार ८५४ विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करावे लागणार आहे.

गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता पहिलीत एकूण १५ हजार ६०८ विद्यार्थी आहेत. इयत्ता दुसरीमध्ये सर्वाधिक १७ हजार २६३, तिसरीत १६ हजार ६५६, तर इयत्ता चाैथीत १६ हजार ८३८ विद्यार्थी यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात दाखल आहेत. इयत्ता पाचवीत १६ हजार १९६, सहावीत १६ हजार २५२, सातवीमध्ये १६ हजार ९२४ आणि आठवीमध्ये १६ हजार ११७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

इयत्ता पहिली ते आठवीच्या मिळून जिल्हाभरात ६४ हजार ६०३ मुली आहेत आणि ६७ हजार २५१ मुलांची संख्या आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात एंट्री करणार आहेत.

काेट .....

शाळेत बाेलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे काेराेनाच्या काळात याेग्य नाही, तसेच सरकारने आरटीईअंतर्गत काेणत्याही मुलाला आठवीपर्यंत नापास करू नये, असे यापूर्वीचा नियम आहे. यावर्षी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे.

- वासुदेव करंगामी, पालक

काेट .....

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद, मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे निर्णय याेग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयाने विद्यार्थी तर खुश हाेतील, मात्र विद्यार्थ्यांना त्या वर्गातील ज्ञान मिळावे, असा आग्रह आहे.

- मीनल वीरवार, पालक

काेट .....

काेराेनामुळे सरकारने वर्ग पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात पास करण्याचा घेतलेला हा निर्णय याेग्यच आहे; परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हे देखील मनाला पटत नाही; परंतु काेराेनाची सद्य:स्थिती पाहता हा निर्णय याेग्यच म्हणावा लागेल.

- नीता आवारी, पालक

काेट .....

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही, तसेच त्यांना शाळेत बाेलावता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.

- आशा कराेडकर, शिक्षिका, गडचिराेली

काेट......

सध्या काेराेनाची परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय याेग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही. हा यामागील उद्देश आहे.

- राजू घुगरे, मुख्याध्यापक

Web Title: 1 lakh 31 thousand students up to 8th standard passed without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.