१ लाख ४० हजारांचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:14+5:302021-09-27T04:40:14+5:30
आसरअल्ली ते तेलंगणा राज्यात मार्गावरून सागवानाची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून वनरक्षक धुर्वे यांनी चिंतलपल्ली येथील तपासणी नाक्यावर २४ ...
आसरअल्ली ते तेलंगणा राज्यात मार्गावरून सागवानाची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून वनरक्षक धुर्वे यांनी चिंतलपल्ली येथील तपासणी नाक्यावर २४ सप्टेंबर राेजी एपी १५ टीए ०३१४ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात अवैधरित्या साग वनोपज येथे आढळून आला. साग छिलपाट २२ नग व साग पाट्या ३२ नग असे एकूण ५४ नग १.९९७ घन मीटर माल आढळून आला. या मालाची किंमत १ लाख ४० हजार आहे. वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनाची किंमत ३ लाख, असा एकूण ४ लाख ४० हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्षेत्र सहाय्यक जे. टी. निमसरकार यांनी वाहनचालक सारय्या नारायण नलबुगा (वय २७ वर्षे, रा. आसरअल्ली) यांच्या विराेधात प्राथमिक गुन्हा नाेंदविला आहे. या प्रकरणाचा तपास सिराेंचाचे वनपरिक्षेत्राधिकारी कटकू व त्यांचा चमू करीत आहे.