दारूसह १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:19+5:302021-06-25T04:26:19+5:30
गडचिराेली तालुक्यातील माडेमूल या गावाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे ...
गडचिराेली तालुक्यातील माडेमूल या गावाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाली आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या. गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या माडेमूल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार शेतशिवारात शोध मोहीम राबवत असताना एक जण हातभट्टी लावून दारू गाळताना आढळून आला. अवैध दारू विक्रेत्यास ताब्यात घेऊन घटनास्थळावर पाहणी केली असता १ लाख ७६ हजार रुपये किमतीचा २७ ड्रम मोहसडवा, ४० लीटर दारू व साहित्य आढळून आले. याप्रकरणी नीलेश मोहुर्ले नामक आरोपीवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात एएसआय अशोक कुमरे, हवालदार दिनकर मेश्राम, आत्माराम गोन्हाडे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली. यावेळी गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.