१०९ नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:56 PM2018-03-24T22:56:51+5:302018-03-24T22:56:51+5:30

शहरवासीयांकडून मालमत्ता कराची झपाट्याने वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात १३ मार्चपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. २३ मार्चपर्यंत ११ दिवसांत पालिका प्रशासनाने १०९ थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ लाख ६३ हजार ६६५ रूपये थकीत कराच्या पोटी वसूल करण्यात आले आहे.

10 9 seizure of property to citizens | १०९ नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

१०९ नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

Next
ठळक मुद्देचार घरांना कुलूप ठोकले : थकबाकीदारांकडून १३ लाख ६३ हजार रूपयांचा थकीत कर वसूल

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : शहरवासीयांकडून मालमत्ता कराची झपाट्याने वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात १३ मार्चपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. २३ मार्चपर्यंत ११ दिवसांत पालिका प्रशासनाने १०९ थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ लाख ६३ हजार ६६५ रूपये थकीत कराच्या पोटी वसूल करण्यात आले आहे.
वसुली पथक प्रमुख नितेश सोनवाने व कर निरिक्षक पुण्यपवार यांच्यासह १८ जणांची चमू १३ मार्चपासून गडचिरोली शहराच्या विविध वार्डात थकबाकीदारांच्या घरी कर वसुलीसाठी भेटी देत आहेत. दरम्यान थकीत कर भरण्यास असमर्थता दर्शविलेल्या कुटुंब प्रमुखांकडून त्यांच्या घरातील साहित्य जप्त केले जात आहे. प्रशासनाने थकबाकीदारांच्या घरून आजपर्यंत चारचाकी, दुचाकी वाहन, फ्रिज, पलंग, सायकल, लाकडी सोफा व इतर साहित्य जप्त केले आहे. थकबाकीदारांच्या चार घरांना कुलूपही ठोकण्यात आले आहे. सदर मालमत्ता जप्ती कारवाईचा धसका घेऊन थकबाकीदार तसेच नागरिक कराचा भरणा करीत आहेत. विशेष म्हणजे, पालिका कार्यालयाच्या कर विभागात जाऊन अनेक नागरिक मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करीत आहेत. पालिकेच्या कार्यालयात दररोज दीड ते १ लाख ७५ हजार रूपयांची कर वसुली होत असल्याची माहिती कर निरिक्षक पुण्यपवार यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
मुख्याधिकारी निपाने यांच्या नेतृत्वात पालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती कारवाई सुरू असून ही कारवाई ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. नागरिकांनी थकीत व चालू वर्षाच्या कराचा भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाने केले आहे.
मालमत्ता कर वसुली ७० टक्क्यांवर
स्थानिक नगर पालिकेची थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण २ कोटी ५४ लाख ४ हजार ४७२ रूपये इतक्या मालमत्ता कराची मागणी आहे. तर थकबाकी व चालू वर्षातील मिळून १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपये पाणीपट्टी कराची मागणी आहे. मालमत्ता व पाणीपट्टी मिळून एकूण ४ कोटी २१ लाख ६० हजार ९७७ रूपयांची मागणी आहे. यापैकी २३ मार्चपर्यंत प्रशासनाने ३ कोटी ३१ लाख ८२ हजार ४०६ रूपयांची कर वसुली केली आहे. आतापर्यंत मालमत्ता कर वसुलीची टक्केवारी ७० टक्क्यावर पोहोचली असून पाणीपट्टी कराची वसुली ९५ टक्के आहे. मालमत्ता कर वसुली ९० टक्क्यांवर पोहोचविण्यासाठी पालिकेचे कर्मचारी धडक मोहीम राबवित आहेत. नागरिकांनी भरणा केलेल्या कर रकमेचा सायंकाळी उशीरापर्यंत हिशोब कर विभागाच्या कार्यालयात केला जात आहे.

Web Title: 10 9 seizure of property to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.