वर्षभरात १० हजार २९८ वीज ग्राहकांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:38 AM2021-04-04T04:38:08+5:302021-04-04T04:38:08+5:30

बाॅक्स पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून ...

10 thousand 298 electricity consumers during the year | वर्षभरात १० हजार २९८ वीज ग्राहकांची भर

वर्षभरात १० हजार २९८ वीज ग्राहकांची भर

Next

बाॅक्स

पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा

गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली ५ टक्के गावे मात्र अजूनही विजेपासून वंचित आहेत. एटापल्ली, भामरागड तालुक्यातील काही गावे अतिशय दुर्गम भागात व घनदाट जंगलात वसली आहेत. काही गावांना डाेंगरांचा वेढा आहे. या गावांमध्ये वीज खांब नेणे कठीण आहे, अशी ५ टक्के गावे विजेपासून वंचित आहेत.

काही गावांना साैरऊर्जेवरील संयंत्र पुरविण्यात आली आहेत. मात्र हे संयंत्र काही दिवसातच बंद पडत असल्याने तेथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

बाॅक्स

वीज जाेडणी देण्याची प्रक्रिया ऑनलाईन

मागणीच्या तुलनेत वीज मीटरचा महावितरणकडे नेहमीच तुटवडा राहते. काही ग्राहकांना एक ते दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटर मिळत नसल्याने वीज जाेडणी हाेत नाही. त्यामुळे वीज जाेडणी देताना गैरव्यवहार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी महावितरणने वीज मीटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देत वीज मीटर उपलब्ध करून वीज जाेडणी दिली जाते. तसेच अर्ज केल्यापासून मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती लक्षात येण्यास वीज ग्राहकांना मदत हाेते.

Web Title: 10 thousand 298 electricity consumers during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.