४५८ सरपंचांना महिन्याला १० हजार; सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:25 PM2024-09-26T14:25:50+5:302024-09-26T14:41:49+5:30

उपसरपंचांनाही लाभ : मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मानधन दुप्पट

10 thousand per month to 458 sarpanches; Double increase in salary of Sarpanch and Deputy Sarpanch | ४५८ सरपंचांना महिन्याला १० हजार; सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ

10 thousand per month to 458 sarpanches; Double increase in salary of Sarpanch and Deputy Sarpanch

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
ग्राम पंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ जिल्ह्यातील ४५८ ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती.


सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट
सरपंचांना १० हजारांपर्यंत 

आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पूर्वी पाच हजार मानधन होते.


उपसरपंचांना चार हजारांपर्यंत
सरपंचाच्या तुलनेत उपसर- पंचाला अर्धे मानधन आहे. आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर चार हजार रूपये मिळतील.


जबाबदारीच्या मानाने अत्यल्प मानधन
सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत कमी मानधन मिळते.


वाढीव मानधन लोकसंख्या मानधन 
० ते २००० : ६००० (सरपंच) २००० (उपसरपंच) 
२००० ते ८००० : ८००० (सरपंच) ३००० (उपसरपंच) 
८००० हून जास्त : १०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)

"सरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. या पदाला साजेशे मानधन राज्य शासनाने देणे अपेक्षित आहे. मानधन दुप्पट केले असले तरी जबाबदारीच्या तुलनेत सदर मानधन अतिशय कमी आहे. यापेक्षा अधिक वाढीची अपेक्षा होती."
- राजू उंदीरवाडे, सरपंच, गोगाव


"दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतीच्या उपसरपंचाला केवळ एक हजार रूपये मानधन होते. आता दोन हजार दिले जाणार आहेत. ही एक प्रकारची उपसरपंच पदाची थट्टा आहे."
- योगाजी कुडवे, उपसरपंच, आंबेशिवणी


 

Web Title: 10 thousand per month to 458 sarpanches; Double increase in salary of Sarpanch and Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.