वडिलाला ठार मारणाऱ्यास १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:43+5:302021-03-09T04:39:43+5:30
गडचिराेली : वडिलाच्या डाेक्यावर उभारीने मारहाण करून ठार मारणाऱ्या मुलास न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची ...
गडचिराेली : वडिलाच्या डाेक्यावर उभारीने मारहाण करून ठार मारणाऱ्या मुलास न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
भास्कर जीवनदास काेटजावरे रा.धर्मपूर ता.चामाेर्शी असे शिक्षा झालेल्या आराेपी मुलाचे नाव आहे. मृतक जीवनदास काेटजावरे यांनी २४ जून २०१९ राेजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पत्नी व मुलाला शिवीगाळ करून घरातील तांदूळ फेकून दिले. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा भास्कर याने वडिलाच्या डाेक्यावर उभारीने मारहाण केली. यात जीवनदास हे जागीच ठार झाले. आराेपीविराेधात कलम ३०२ अन्वये आष्टी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी तपास करून दाेषाराेपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.सी. खटी यांनी आराेपीला कलम ३०४ अन्वये दाेषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.एस.यू.कुंभारे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पाेलीस निरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.