निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांचे रक्तदान

By admin | Published: September 26, 2016 01:31 AM2016-09-26T01:31:26+5:302016-09-26T01:31:26+5:30

संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी ८ ते ५ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

101 members of Nirankari Mandal donate blood | निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांचे रक्तदान

निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांचे रक्तदान

Next

जिल्हा रूग्णालयात शिबिर : १५० जणांची रक्तगट तपासणी
गडचिरोली : संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी ८ ते ५ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरादरम्यान संत निरंकारी मंडळाच्या १०१ सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिला.
संत निरंकारी मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे तसेच आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येते. संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी केमिस्ट भवनात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला होता. त्यानंतर रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. नारायण कर्रेवार, गजानन तुंकलवार, वन परिक्षेत्राधिकारी वसंत मेडेवार, भास्कर मडावी, रमेश टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरादरम्यान तब्बल १०१ सदस्यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी डॉ. नागफासे, रक्तपेढीचे पीआरओ सतीश तडकलावार, तंत्रज्ञ पेट्टीवार, वाघाडे, बालपांडे, भुरसे, प्राची भैसारे, खुशी मलगाम, देशमुख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 101 members of Nirankari Mandal donate blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.