१०२ अधिकारी व जवानांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:08 AM2018-05-05T01:08:01+5:302018-05-05T01:08:01+5:30

102 The honor of the officers and the soldiers | १०२ अधिकारी व जवानांचा गौरव

१०२ अधिकारी व जवानांचा गौरव

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांकडून कौतुक : शांतीचा संदेश वाचन उपक्रमात भरीव योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या १०२ पोलीस अधिकारी व जवानांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कामगार दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या एकलव्य इमारतीत सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, महेश्वर रेड्डी, डॉ. हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, नृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास चूंचूवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा मुख्यालयाच्या मैदानावर पाच हजार नागरिकांनी एकत्र येत शांतीचा संदेश वाचनाचा उपक्रम राबवून जागतिक विक्रम नोंदविला. याबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. चरणजित सलुजा तसेच किरण तारे, ओमप्रकाश चुनारकर यांचाही सन्मान करण्यात आला.

Web Title: 102 The honor of the officers and the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस