महासंचालक पदक प्राप्त १०२ पोलिसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:49 PM2019-05-03T23:49:58+5:302019-05-03T23:51:22+5:30
गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी करणाºया १०२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले. या पदक प्राप्त सर्व पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते महासंचालकांचे पदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी करणाºया १०२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले. या पदक प्राप्त सर्व पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते महासंचालकांचे पदक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर शानदार सोहळा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस कवायत मैदानावर रंगला. दिवंगत सहायक पोलीस निरिक्षक योगेश गुजर यांना देखील उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते. यावेळी त्यांचे पदक त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारले. याशिवाय सत्र क्रमांक ११३ बॅचच्या अधिकाºयांनी यावेळी जमा केलेला २३ लाख ७३ हजार रुपयांचा मदत निधी जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या हस्ते योगेश गुजर यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.