अभ्यासासाठी रागावल्याने विद्यार्थिनीने संपविले जीवन; घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:08 IST2023-02-03T18:05:56+5:302023-02-03T18:08:45+5:30
पूनम १० व्या वर्गात शिकत होती

अभ्यासासाठी रागावल्याने विद्यार्थिनीने संपविले जीवन; घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या
गडचिराेली : दहावीचे वर्ष असल्याने अभ्यास करण्यावरून आईने मुलीला रागावले असता, रागाच्या भरात मुलीने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
पुनम गाथाराम निकुरे (१६) रा. इंदिरानगर, गडचिराेली असे मृत मुलीचे नाव आहे. पुनम ही शहरातील राणी दुर्गावती विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत हाेती. दहावीची परीक्षा जवळ आली असतानही पुनम अभ्यास करीत नव्हती. अभ्यास करण्यासाठी आईने सांगितले असता पुनमने ही बाब मनावर घेतली.
आईने पुनमला आंघाेळ करण्यासाठी गरम पाणी टाकून ती थाेड्या वेळासाठी घराच्या बाहेर निघाली. मुलगी आंघाेळ करीत असावी, असा तिचा अंदाज झाला. घरी येऊन बघितले असता तिने घराच्या बेडरूममध्ये ओढणीने आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. तक्रारीवरून गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.