दारू व तंबाखूमुक्तीसाठी ११ ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:36+5:302021-09-16T04:45:36+5:30
या वेळी संवर्ग विकास अधिकारी लाकडे यांनी दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. चुटुगुंटा ...
या वेळी संवर्ग विकास अधिकारी लाकडे यांनी दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. चुटुगुंटा येथील कार्यशाळेत लगाम, शांतिग्राम, कोठारी व चुटुगुंटा ग्रामपंचायतीचे १४ पदाधिकारी उपस्थित होते. मुलचेरा येथील कार्यशाळेत मल्लेरा, कालिनगर, वेंगनूर, गोमणी, बोलेपल्ली, देवदा व विवेकानंदपूर या ७ ग्रामपंचायतचे १८ पदाधिकारी सहभागी झाले होते. अशा एकूण ३२ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दारू व तंबाखूमुक्त ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मुक्तिपथ कार्यकर्ते रिना सरकार यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
यावर झाली चर्चा व मार्गदर्शन
कार्यशाळेत ग्रामपंचायत दारूबंदी कायदा, ग्रामपंचायत अधिनियम, कोटपा कायदा, बाल संरक्षण कायदा, पेसा कायदा, अन्न व सुरक्षा मानके कायदा, सुगंधात तंबाखू कायदा, शाळाबाह्य पानठेले, गावातील किराणा आणि पानठेले यांची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करणे, गाव संघटना मजबूत करून गावातील व्यसनाचे प्रमाण कसे कमी करता येईल, गावातील व्यसनींना उपचार घेण्यास प्रवृत्त करणे, गावातील व्यसनावर होणारा खर्च कमी करून गावाचा विकास कसे साध्य करता येईल इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.