११ हजार नवागतांचा शाळा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:39 PM2018-06-25T22:39:38+5:302018-06-25T22:40:01+5:30

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.

11 thousand new entrants to school | ११ हजार नवागतांचा शाळा प्रवेश

११ हजार नवागतांचा शाळा प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देजल्लोषात होणार आज स्वागत : शिक्षण विभागासह शाळांची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दीड हजारांवर प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या मिळून १५ च्या आसपास प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय विविध संस्थांमार्फत अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा व संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
शाळा प्रवेशोत्सवाबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ९ जून २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयात शाळा प्रवेशोत्सवाच्या विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अधिकारी व राजकीय पदाधिकारी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचविणे, वाद्यांच्या निनादात गावातून प्रभातफेरी काढणे, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरित करणे, शैक्षणिक धोरण व उपक्रमांबाबत उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी बाबींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ९६३ मुले व ५ हजार ७९७ मुली अशा एकूण ११ हजार ७६० नवागत विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाची तयारी शाळा व शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाली आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गोड भोजन देण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, पदाधिकारी उत्साहित आहेत.
अधिकारी शाळांना भेटी देणार
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम शासन धोरणानुसार नियोजन पध्दतीने पार पाडण्यात यावा, यासाठी शिक्षण विभाग दक्ष आहे. शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश वितरित होतात काय? याबाबतची पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देणार आहेत.

Web Title: 11 thousand new entrants to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.