दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूसह ११० नवीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:00 AM2020-10-30T05:00:00+5:302020-10-30T05:00:20+5:30
गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३३ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १५.६६ टक्के तर मृत्यूदर १.१ टक्के झाला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी जिल्हयात ११० नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर दोन कोरोनाबाधित दगावले. त्यामुळे कोरोनाने दगा. दरम्यान १३७ जणांनी कोरोनावर मात केल्याने गुरूवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
जिल्हयातील आतापर्यंत बाधित ५६५१ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४७०९ वर पोहोचली आहे. सद्या ८८५ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३३ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १५.६६ टक्के तर मृत्यूदर १.१ टक्के झाला.
नवीन ११० बाधितांमध्ये गडचिरोली ४६, अहेरी १०, आरमोरी ४, भामरागड २३, चामोर्शी ६, धानोरा ४, एटापल्ली ३, कुरखेडा ३, मुलचेरा २, सिरोंचा ४ व वडसा येथील ५ जणांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झालेल्या १३७ रूग्णांमध्ये गडचिरोली ५१, अहेरी २८, आरमोरी ५, भामरागड ३, चामोर्शी १७, धानोरा २, एटापल्ली २, मुलचेरा ९, सिरोंचा २, कोरची ७, कुरखेडा ७ व वडसामधील ४ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील श्रीरामनगर येथील १, स्थानिक ३, गोंडवाना युनिर्व्हसिटीच्या जवळ ३, कॅम्प एरिया ६, बसेरा कॉलनी २, टी पॉईंट १, गोकुलनगर ५, कलेक्टर कॉलनी १, कोटगल १, साईनगर २, महिला महाविद्यालयाच्या जवळ १, मेडिकल कॉलनी १, रामनगर १, रेव्हेन्यु कॉलनी २, स्नेहानगर १, रामपुरी वार्ड २, आयटीआय होस्टेल १, आरमोरी रोड १, पोलीस कॉलनी १, विसापूर १, साई ट्रॅव्हल्सजवळ १, पोटेगाव १, नवेगाव कॉम्पलेक्स १, अयोध्यानगर १, आशिर्वाद नगर १, केमिस्ट भवन १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ९, एसडीएच १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये डोंगरगाव २, स्थानिक २, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २३, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कृष्ण नगर २, जयनगर १, सोनापूर १, आष्टी २, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड १, स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, अंगारा २, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, गोविंदपुर १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये अंकिसा येथील ४, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये टीएचओ कार्यालयामधील १, कस्तुरबा वार्ड १, गांधी वार्ड २, कोरेगाव १, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये ३ जणांचा समावेश आहे.