रोजगार मेळाव्यात १,१३७ युवकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:58 AM2018-03-28T00:58:13+5:302018-03-28T00:58:13+5:30

दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 1,137 attendance of youth in the employment gathering | रोजगार मेळाव्यात १,१३७ युवकांची उपस्थिती

रोजगार मेळाव्यात १,१३७ युवकांची उपस्थिती

Next
ठळक मुद्देजिल्हाभरातील बेरोजगारांची गर्दी : नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्राचा पुढाकार

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला जिल्हाभरातील १ हजार १३७ बेरोजगार युवकांनी उपस्थिती दर्शवून रोजगारासाठी नोंदणी केली.
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक पी. एम. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, उद्योग उभारून तो यशस्वी करण्यासाठी सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे. उद्योग उभारणीसाठी प्रशासकीय यंत्रणा आर्थिक मदत करेल. योग्य ते मार्गदर्शन करेल. मात्र व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संबंधित व्यक्तीलाच स्वत: प्रयत्न करावे लागेल. रोजगारासाठी गाव व जिल्हा सोडण्याची तयारी युवकांनी केली पाहिजे. वाढलेल्या स्पर्धेत चिकाटी व मेहनतीशिवाय उद्योग यशस्वी होणार नाही. अनेक प्रकारचे उद्योग व व्यवसाय करता येतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या व्यवसायात आपल्याला आवड व कौशल्यप्राप्त आहेत. त्या व्यवसायाचीच निवड करावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोद भोसले यांनी मुद्रा योजनेबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक मुख्याधिकारी कृष्णा निपाने, संचालन प्रमोद भानारकर तर आभार घोसे यांनी मानले. सदर मेळावा कौशल्य विकासचे व्यवस्थापक गणेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी छगण काळबांधे, दिनेश धोटे, संजय बोलुवार, अशोक गेडाम, मनिष खोब्रागडे, संतोष करपे, गणेश नाईक यांनी सहकार्य केले.
२९ संस्थांचे स्टॉल
रोजगार मेळाव्यादरम्यान रोजगार देणाऱ्या सात संस्था, विविध प्रकारची आठ महामंडळे, पाच बँका, कौशल्य विकास प्रशिक्षण देणाºया सहा संस्था व तीन विमा कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. युवकांच्या शिक्षण व प्रशिक्षणानुसार नोंदणी करून करण्यात आली.

Web Title:  1,137 attendance of youth in the employment gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.