१.१८ लाख शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:37 PM2019-02-25T22:37:53+5:302019-02-25T22:38:18+5:30

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.

1.18 lakh farmers eligible for honor scheme | १.१८ लाख शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र

१.१८ लाख शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र

googlenewsNext
ठळक मुद्देचामोर्शी तालुक्यात सर्वाधिक लाभ : ६८ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लाभ तातडीने शेतकºयांना मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देऊन पात्र शेतकºयांची यादी काढण्यात आली. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेचे भिजत घोंगडे आणि त्यामुळे ओढवून घेतलेली शेतकºयांची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने ही योजना अंमलात आणण्यात आली. महिन्याला ५०० रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६ हजार रुपये शेतकºयांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे वर्षातून ३ टप्प्यात ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. १ फेब्रुवारी २०१९ पासून लागू झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चक्क मे महिन्यापर्यंतची रक्कम अग्रिम स्वरूपात शेतकºयांना मिळत आहे. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकºयांना लाभ मिळणार आहे.
१५७५ गावांची माहिती पोर्टलवर अपलोड
जिल्ह्यातील १६८० गावांपैकी १५७५ गावांमधील शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यात ६८ हजार १०६ पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली. यात संबंधित यंत्रणेने सोमवारपर्यंत ९७.७४ टक्के उद्दीष्ट गाठले होते. विशेष म्हणजे गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कोरची, अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा या ८ तालुक्यांच्या शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे उद्दीष्ट १०० टक्के गाठण्यात यंत्रणेला यश आले आहे.

Web Title: 1.18 lakh farmers eligible for honor scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.