व्यसनी १२ रुग्णांनी घेतला उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:42 AM2021-09-24T04:42:49+5:302021-09-24T04:42:49+5:30
गावातील व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने जेप्रा येथे एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले ...
गावातील व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने जेप्रा येथे एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकला १२ रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. सोबतच रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. या वेळी रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची माहिती घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. क्लिनिकचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवानंद चलाख, मनोहर झंझाळ, वामन गडपायले, खुमेश हर्षे, आकाश टेकाम, शशिकला झंझाळ आदींनी सहकार्य केले.